वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : %ट्विटरची मालकी बदलली डोनाल्ड ट्रम्प यांच्या वरील बंदी हटली” अशीच स्टोरी आता घडणार आहे. Twitter ownership changed; The ban on Donald Trump was lifted
टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच ट्विटर हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतला. त्यानंतर ट्विटरचे नवे मालक होताच एलन मस्क यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील ट्विटरवरील कायमस्वरूपी बंदी मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही विधानांमुळे ट्विटर त्याआधीच्या मालकांनी ज्यांचे अकाउंट सस्पेंड करून त्यांच्यावर बंदी घातली होती. पण ही बंदी उठवणार असल्याचा मोठा निर्णय एलन मस्क यांनी घेतला आहे.
ट्रम्प यांच्यावरील ट्विटर बंदी हटविणार
एलन मस्क यांच्या या घोषणेमुळे ट्रम्प लवकरच मायक्रोब्लॉगिंग वेबसाइटवर परतणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासह असेही सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ट्विटरवर बंदी घालण्याचा निर्णय हा नैतिकदृष्ट्या चांगला निर्णय नव्हता. टेस्लाचे मुख्य कार्यकारी एलन मस्क यांनी मंगळवारी ‘फायनान्शियल टाइम्स फ्यूचर ऑफ द कार कॉन्फरन्स’मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर खात्यावरील बंदी संपुष्टात आणणार असल्याचे सांगितले. दरम्यान एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यावर नाही तर ही शक्यता फार पूर्वीपासून व्यक्त केली जात होती.
ट्रम्प यांची अकाऊंट ब्लॉक
अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये सत्तांतर झाल्यानंतर लोकांनी हिंसाचार सुरु केल्याने ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर कायमची बंदी घातली होती. 6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटल कॉम्प्लेक्स येथे झालेल्या हिंसाचारानंतर फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबने ट्रम्प यांची अकाऊंट ब्लॉक केली होती. अध्यक्षीय निवडणुकीत जो बायडेन यांचा विजय झाला होता. यामुळे ट्रम्प आपल्या समर्थकांना हिंसाचारासाठी आणखी चिथावणी देऊ शकतात, असे या कंपन्यांनी म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या अकाऊंटवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
Twitter ownership changed; The ban on Donald Trump was lifted
महत्वाच्या बातम्या
- NIA Court : काश्मिरी दहशतवादी बिट्टा कराटे, शब्बीर शाह, हाफिज सईद, सय्यद सलाउद्दीनवर युएपीए आरोपपत्र दाखल!!
- सिध्दू म्हणतात, पंजाबमध्ये आता गद्दारांची खैर नाही, कॉँग्रेसच्या नाकावर टिच्चून घेतली मुख्यमंत्री मान यांची भेट
- NFHS Survey : स्री – पुरुष समानतेच्या दिशेने; 82% महिला पतीला सेक्ससाठी थेट नकार देऊ शकतात, तर 66% पुरुष म्हणतात, “इट्स ओके”!!