Twitter : भारत सरकार आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरमधील संघर्ष अद्याप संपलेला नाही. ट्विटर नवीन आयटी नियम स्वीकारण्यास काहीसा नाखुश आहे, तसेच ट्विटरकडून गेल्या काही दिवसांत काही चुकाही झाल्या आहेत. या सर्वांच्या दरम्यान आयटी व्यवहारविषयक संसदीय समितीने ट्विटरला काही प्रश्नांची उत्तरे मागितली होती, ज्यांचे उत्तर गुरुवारपर्यंत द्यावे लागेल. Twitter has to answer the questions of the Parliamentary Committee today, NCW also adopted a tough stand
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत सरकार आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरमधील संघर्ष अद्याप संपलेला नाही. ट्विटर नवीन आयटी नियम स्वीकारण्यास काहीसा नाखुश आहे, तसेच ट्विटरकडून गेल्या काही दिवसांत काही चुकाही झाल्या आहेत. या सर्वांच्या दरम्यान आयटी व्यवहारविषयक संसदीय समितीने ट्विटरला काही प्रश्नांची उत्तरे मागितली होती, ज्यांचे उत्तर गुरुवारपर्यंत द्यावे लागेल.
संसदीय समितीचे प्रश्न
अलीकडेच ट्विटरने केंद्रीय आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांचे खाते काही काळ लॉक केले होते, यापूर्वी कॉंग्रेस नेते शशी थरूर यांच्या बाबतीतही असे घडले होते. शशी थरूर हे आयटी व्यवहारविषयक संसदीय समितीचे प्रमुख आहेत. समितीच्या वतीने या विषयावर ट्विटरकडून 48 तासांत उत्तर मागण्यात आले, हा कालावधी आज म्हणजेच गुरुवारीच संपत आहे.
ट्विटरवर महिला आयोगही कठोर
भारतात ट्विटरच्या अडचणी एवढ्यावरच थांबलेल्या नाहीत. संसदीय समितीशिवाय आता राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू) देखील ट्विटरवर कठोर भूमिका घेतली आहे. ट्विटरवरील अश्लील सामग्रीसंदर्भात एनसीडब्ल्यूने ट्विटरकडून प्रतिसाद मागितला असून अशी सामग्री काढून टाकण्यास सांगितले आहे. महिला आयोगाने यासाठी ट्विटरला केवळ एका आठवड्याचा कालावधी दिला आहे.
ट्विटरविरुद्ध अनेक प्रकरणे
अलीकडेच दिल्लीमध्ये घडलेल्या अश्लील सामग्रीसंदर्भात ट्विटरवर एफआयआरही नोंदविण्यात आला होता. ट्विटरवर बाल शोषणासंदर्भात एक खटला होता आणि कारवाईची मागणी करण्यात आली. ट्विटरवरून दिल्ली पोलिसांना प्रत्युत्तरही देण्यात आले आणि असे म्हटले की, बाल शोषणाच्या प्रकरणात त्यांची झीरो टॉलेरन्स पॉलिसी आहे.
यापूर्वी गाझियाबाद हल्ल्याप्रकरणी ट्विटरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यासंदर्भात गाझियाबाद पोलिसांनी ट्विटरच्या एमडीला पोलीस ठाण्यात हजर होण्यास सांगितले होते. याशिवाय मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये ट्विटरवर जम्मू-काश्मीर आणि लडाखला भारतापेक्षा वेगळे दाखवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Twitter has to answer the questions of the Parliamentary Committee today, NCW also adopted a tough stand
महत्त्वाच्या बातम्या
- कोव्हिशील्ड मान्यतेचा गोंधळ, युरोपियन युनियनवर भडकले 54 आफ्रिकी देश, ईयूकडून भेदभाव होत असल्याचा आरोप
- अमूल दूध, LPG सिलिंडरच्या दरांमध्ये वाढ, बँकेचे शुल्कही वाढले, जाणून घ्या आजपासून काय-काय झालं महाग!
- तीन तास ठप्प राहिल्यानंतर ट्विटरची सेवा पुन्हा सुरू, डेस्कटॉप युजर्सना येत होती अडचण
- धर्मांतराचे बीड कनेक्शन : अटकेतील इरफान दोन वेळा मोदींसोबत व्यासपीठावर, पंतप्रधानांनीही दिली होती शाबासकी
- बोगस लसीकरणाचे बारामती कनेक्शन , मुंबईत बनावट लस देणाऱ्यास अटक