• Download App
    पश्चिम बंगालमधील हिंसाचारप्रकरणी तृणमूलच्या नेत्याला अटक|Trinamool leader arrested in West Bengal violence case

    पश्चिम बंगालमधील हिंसाचारप्रकरणी तृणमूलच्या नेत्याला अटक

    विशेष प्रतिनिधी

    कोलकत्ता : पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर उफाळलेल्या हिंसाचारप्रकरणी चौकशी करीत असलेल्या सीबीआयने मंगळवारी तृणमूलच्या नेत्याला अटक केली. रवी बस्के असे या नेत्याचे नाव असून तो वीरभूम जिल्ह्यातील तृणमूलसाठी कार्यरत आहे.Trinamool leader arrested in West Bengal violence case

    बंगालमधील हिंसाचारात भाजपा कार्यकर्ता गौरव सरकार याच्या हत्येप्रकरणी बस्के याला ताब्यात घेण्यात आले आहे. अटक होताच त्याला बोलपूर न्यायालयात सादर करण्यात आले. तीन दिवसांसाठी सीबीआय कोठडीत रवानगी करण्यात आली. यापूर्वी या प्रकरणी दिलीप मिर्धा या तृणमूल नेत्याला अटक झाली आहे.



    पश्चिम बंगालमध्ये दोन मे रोजी विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. यावेळी तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडांनी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार केला. भाजपाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले.

    काही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांच्या घरातल्यांवर बलात्कारही करण्यात आले होते. फाशी देऊन अनेकांच्या हत्या करण्यात आल्या. त्यामुळे या हिंसाचाराची चौकशी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने करावी असे आदेश कोलकत्ता उच्च न्यायालयाने दिले होते.

    Trinamool leader arrested in West Bengal violence case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार