• Download App
    तृणमूल कॉँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन निलंबित, सभापतींच्या दिशेने भिकावले नियमांचे पुस्तक|Trinamool Congress leader Derek O'Brien suspended, begging for rules

    तृणमूल कॉँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन निलंबित, सभापतींच्या दिशेने भिकावले नियमांचे पुस्तक

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) राज्यसभा सदस्य डेरेक ओ ब्रायन यांना हिवाळी अधिवेशनाच्या राहिलेल्या दिवसांसाठी मंगळवारी निलंबित करण्यात आले आहे. इलेक्टोरल रोल विधेयकावरील चर्चेत नियमांचे पुस्तक सभापतींच्या टेबलच्या दिशेने फेकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.Trinamool Congress leader Derek O’Brien suspended, begging for rules

    सभागृहातील गदारोळाचा हवाला देऊन सभापतींनी मतदानाची अनुमती दिली नव्हती, तेव्हा ओ ब्रायन यांनी तसे केले. यानंतर विरोधी नेत्यांनी सभात्याग केला. सरकारने डेरेक ओ ब्रायन यांच्या वर्तनावर आक्षेप घेतला गेला आणि त्यांच्या निलंबनाची मागणी केली गेली.



    ब्रायन यांना अधिवेशनाच्या राहिलेल्या दिवसांसाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडला गेला. आक्षेपार्ह वर्तनासाठी त्यांना निलंबित केले गेले.डेरेक ओ ब्रायन यांनी निलंबन हा सरकारचा कट असल्याचे म्हटले. ते म्हणाले, निवडणूक सुधारणा कायद्यासाठी बहुमत निर्माण करण्यासाठी विरोधी पक्षाच्या सदस्यांना निलंबित केले गेले.

    आशा आहे की, कृषी कायद्यांप्रमाणे हे विधेयकही सरकारला लवकरच परत घ्यावे लागेल. हे विधेयक संसदेच्या निवड समितीकडे पाठवण्यासाठी राज्यसभा सदस्यांना पुरेसा वेळ दिला गेला नाही, असा आक्षेप ओ ब्रायन यांनी हे विधेयक मांडले जात असताना घेतला होता. हा आक्षेप उपसभापती हरिवंश यांनी फेटाळला.

    Trinamool Congress leader Derek O’Brien suspended, begging for rules

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??