• Download App
    ट्रॅक्टर पॉलिटिक्स : राहुल गांधी ज्या ट्रॅक्टरने संसदेत गेले, ते पोलिसांनी केले जप्त, नंबर प्लेटसुद्धा लावलेली नव्हती । Tractor Driven by Rahul Gandhi Confiscated By Delhi Police Parliament Monsoon Session Farm Laws

    ट्रॅक्टर पॉलिटिक्स : राहुल गांधी ज्या ट्रॅक्टरने संसदेत गेले, ते पोलिसांनी केले जप्त, नंबर प्लेटसुद्धा लावलेली नव्हती

    Tractor Driven by Rahul Gandhi : सोमवारी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कृषी कायद्यांच्या विरोधात ट्रॅक्टर चालवून संसदेत पोहोचल्यामुळे चर्चेत आले आहेत. परंतु जे ट्रॅक्टर त्यांनी वापरले त्याचीच आता चर्चा सुरू झाली आहे. हे ट्रॅक्टर आता दिल्ली पोलिसांनी जप्त केले आहे. पावसाळी अधिवेशनामुळे अतिसुरक्षित असणाऱ्या या भागात कलम 144 लागू आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता राहुल गांधी ट्रॅक्टर चालवत आले, म्हणून ट्रॅक्टर जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. Tractor Driven by Rahul Gandhi Confiscated By Delhi Police Parliament Monsoon Session Farm Laws


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : सोमवारी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कृषी कायद्यांच्या विरोधात ट्रॅक्टर चालवून संसदेत पोहोचल्यामुळे चर्चेत आले आहेत. परंतु जे ट्रॅक्टर त्यांनी वापरले त्याचीच आता चर्चा सुरू झाली आहे. हे ट्रॅक्टर आता दिल्ली पोलिसांनी जप्त केले आहे. पावसाळी अधिवेशनामुळे अतिसुरक्षित असणाऱ्या या भागात कलम 144 लागू आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता राहुल गांधी ट्रॅक्टर चालवत आले, म्हणून ट्रॅक्टर जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

    ट्रॅक्टर चालवत राहुल गांधी संसदेत पोहोचले आणि कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे समर्थन करताना त्यांना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. रणदीप सुरजेवाला, दीपेंद्र हुडा आणि कॉंग्रेसचे अनेक नेते राहुल गांधी यांच्यासमवेत ट्रॅक्टरवर होते. दिल्ली पोलिसांनी कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला आणि श्रीनिवास बी. यांना ताब्यातही घेतले होते.

    राहुल गांधींकडून कृषी कायदे मागे घेण्याची मागणी

    संसदेत पोहोचताना राहुल गांधींनी माध्यमांना सांगितले, “आम्ही शेतकऱ्यांचा संदेश घेऊन संसदेत आलो आहोत. शेतकऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. सरकारला कृषी कायदे मागे घ्यावे लागतील. हे कायदे 2-3 बड्या उद्योगपतींसाठी आहेत. हे शेतकर्‍यांच्या फायद्याचे नाहीत. हे काळे कायदे आहेत.” यामुळे कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून संसदेतही मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे.

    Tractor Driven by Rahul Gandhi Confiscated By Delhi Police Parliament Monsoon Session Farm Laws

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sameer Wankhede : शाहरुख खानचे प्रॉडक्शन हाऊस व नेटफ्लिक्सला समन्स; समीर वानखेडेंच्या याचिकेवर दिल्ली HCने 7 दिवसांत मागितले उत्तर

    Amit Shah : अमित शहा जीमेलवरून स्वदेशी झोहो मेलवर शिफ्ट; म्हणाले- आता या आयडीवर मेल पाठवा; श्रीधर वेम्बूंनी तयार केले झोहो मेल

    ब्रिटिश पंतप्रधानांच्या दौऱ्याचा महाराष्ट्राला फायदा; गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि विकासाच्या नव्या क्षितिजाकडे राज्याची वाटचाल!!