• Download App
    Tokyo Paralympics :शेवटचा दिस गोड ...भारतासाठी 'सुवर्ण' क्षण ! कृष्णा नागरची जबरदस्त कामगिरी ; बॅटमिंटनमध्ये दुसरं सुवर्ण पदक । Tokyo Paralympics 2021 Live Updates: Shuttler Krishna Nagar wins gold, India finish with 19 medals

    Tokyo Paralympics :शेवटचा दिस गोड …भारतासाठी ‘सुवर्ण’ क्षण ! कृष्णा नागरची जबरदस्त कामगिरी ; बॅटमिंटनमध्ये दुसरं सुवर्ण पदक

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : टोकियो पॅरालिम्पिकच्या शेवटच्या दिवसाची सकाळ भारतासाठी सुवर्ण क्षण ठरली आहे . बॅटमिंटनमध्ये भारताला दुसरं सुवर्ण पदक मिळालं. भारताच्या कृष्णा नागरने जबरदस्त कामगिरी करत हाँगकाँगच्या के चू मान केई याचा पराभव करत सुवर्ण पदकावर नाव कोरलं. Tokyo Paralympics 2021 Live Updates: Shuttler Krishna Nagar wins gold, India finish with 19 medals

    रविवारी म्हणजे टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेच्या अखेरच्या दिवशीही भारताची घोडदौड कायम राहिली. भारताच्या सुहास यथिराजनं रौप्य पदकाची कमाई केल्यानंतर कृष्णा नागरने भारताच्या खात्यात सुवर्ण पदक जमा केलं.

    बॅटमिंटनमध्ये एसएच-6 प्रकारात कृष्णा नागरचा अंतिम फेरीत हाँगकाँगच्या के चू मान केईसोबत लढत झाली. तीन सेटमध्ये सामना रंगला. पहिला सेट भारताच्या कृष्णा नागरने 21-17 अशा फरकाने आपल्या नावे केला. तर दुसऱ्या सेटमध्ये के चू मान केईने वापसी केली.

    के चू मान केईने दुसरा सेट 21-16 ने जिंकला. त्यानंतर तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये भारताच्या कृष्णाने पुन्हा वापसी केली. कृष्णाने तिसरा सेट 21-13 अशा फरकाने जिंकत सुवर्ण पदक पटकावलं.

    भारताची सर्वोत्तम कामगिरी

    टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची एकूण 19 पदकं झाली आहेत. पॅरालिम्पिक खेळांच्या इतिहासात भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. 11 पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये भारताने 12 पदकं जिंकली आहेत. 5 सुवर्ण, 8 रौप्य व 6 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत 1968 पासून पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी होत असून, 1976 व 1980 मध्ये भारत सहभागी झाला नव्हता.

    Tokyo Paralympics 2021 Live Updates: Shuttler Krishna Nagar wins gold, India finish with 19 medals

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले