वृत्तसंस्था
चंद्रपूर : गडचिरोलीत बुधवारी पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या गोळीबारात दोन जहाल नक्षलवादी ठार झाले आहेत. त्यांच्यावर आठ लाखांचे बक्षिस होते. एटापल्ली तालुक्यातील जांभिया-गट्टा पोलीस मदत केंद्राच्या परिसरातील जंगलात ही चकमक उडाली.To those who set fire to vehicles in Gadchiroli Strong tremors
त्यात विनय नरोटे, विवेक नरोटे हे नक्षलवादी ठार झाले आहेत. गडचिरोलीत सी-60 पोलिस पथक जंगल परिसरात शोधमोहीम राबवत होते. बुधवारी सकाळी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात हे दोन नक्षलवादी ठार झाले.
नक्षलवाद्यांनी 26 एप्रिलला बंद पुकारला होता. अहेरी तालुक्यातील मेडपल्ली येथे वाहनांची जाळपोळ केली होती. त्यानंतर केलेल्या या कारवाईमुळे नक्षलवाद्यांना मोठा हादरा बसला आहे.
To those who set fire to vehicles in Gadchiroli Strong tremors
महत्त्वाच्या बातम्या
- दिल्लीतील केजरीवाल सरकारलाच लोक मरताना पाहायचेत, रेमडेसिव्हीरच्या प्रोटोकॉलवर उच्च न्यायालय भडकले
- ‘सिंघम’ ची साथ : कोरोना रुग्णांसाठी मदतीचा हात; मुंबई महानगरपालिकेला दिले १ कोटी
- Maharashtra Corona Update : राज्यात ९८५ मृत्यू, तर ६३ हजार ३०९ जणांना कोरोनाची लागण २४ तासांतील भयावह चित्र
- घर सुधरेना पण संजय राऊत यांना उत्तर प्रदेशची चिंता, उध्दव ठाकरेंची ओवाळत म्हणाले कोरोनाविरुध्द लढण्याचे महाराष्ट्र मॉडेल