Gadchiroli : गडचिरोलीत काँग्रेसला मोठा धक्का; वडेट्टीवारांच्या बालेकिल्ल्यात ‘ऑपरेशन लोटस’; धानोरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह 9 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
गडचिरोलीच्या राजकारणात अत्यंत मोठी आणि खळबळजनक घडामोडी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या गडचिरोलीतील राजकीय बालेकिल्ल्याला भाजपने सुरुंग लावला आहे. धानोरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा आणि उपनगराध्यक्षांसह तब्बल ९ नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नागपुरात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा दिमाखात पार पडला.