• Download App
    निवडणूक आयोगाने प्रचारबंदी लादल्याच्या निषेधार्थ उद्या ममतांचे कोलकात्यात धरणे आंदोलन | To protest against the undemocratic and unconstitutional decision of the Election Commission of India, I will sit on dharna tomorrow at Gandhi Murti

    निवडणूक आयोगाने प्रचारबंदी लादल्याच्या निषेधार्थ उद्या ममतांचे कोलकात्यात धरणे आंदोलन

    वृत्तसंस्था

    कोलकाता – धर्माच्या आधारावर प्रचारात मते मागणे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भोवले आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्यावर उद्या रात्री ८.०० वाजेपर्यंत प्रचार करण्यावर बंदी घातली आहे. पण आता या निर्णयाच्या निषेधार्थ ममता बॅनर्जी या उद्या दुपारी १२.०० वाजल्यापासून कोलकात्याच्या गांधी मूर्तीपाशी धरणे आंदोलनाला बसणार आहेत. स्वतः ममता बॅनर्जी यांनीच हे स्टेटमेंट दिले आहे. To protest against the undemocratic and unconstitutional decision of the Election Commission of India, I will sit on dharna tomorrow at Gandhi Murti

    तत्पूर्वी, निवडणूक आयोगाने नियमानुसार ममता बॅनर्जी यांच्या भाषणाची छाननी केली. त्यांच्याकडून त्यावर लेखी स्पष्टीकरण मागविले आणि त्यानंतर त्यामध्ये धर्माच्या आधारावर ममतांनी मते मागितल्याचे सिध्द झाल्याने त्यांच्यावर २४ तासांची निवडणूक प्रचारबंदी घातली. ही प्रचारबंदी आज रात्री ८.०० पासून सुरू होऊन उद्या रात्री ८.०० वाजता संपणार आहे. मात्र, या निर्णयाच्या निषेधार्थ ममता बॅनर्जी या कोलकात्यातील गांधी मूर्तीपाशी धरणे आंदोलन करणार आहेत.

    -अल्पसंख्याक मतदारांना ममतांचे आवाहन

    ममता बॅनर्जी यांनी मुस्लीम मतदारांना भाजपचा पराभव करण्यासाठी एकजूटीने तृणमूळ काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले होते. पश्चिम बंगालमधले फुर्फुरा शरीफचे मौलवी अब्बासी आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी हे भाजपची बी टीम आहे. भाजपकडून पैसे घेऊन ते मुसलमानांची मते फोडण्याचा प्रयत्न करतात. त्यांना मतदान करणे म्हणजे तृणमूळ काँग्रेसला पराभूत करण्यासाठी भाजपला मदत करण्यासारखेच आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी जाहीर सभांमध्ये केला होता.

    त्यांच्या भाषणांविरोधात विविध पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने ममतांच्या भाषणाची छाननी करून त्यांच्या प्रचारावर २४ तासांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उद्या रात्री ८.०० वाजेपर्यंत त्यांना प्रचारात भाग घेता येणार नाही, असे सांगण्यात येत आहे.

    To protest against the undemocratic and unconstitutional decision of the Election Commission of India, I will sit on dharna tomorrow at Gandhi Murti

    Related posts

    कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांचा दुहेरी “डाव”; एकीकडे आरोग्य मंत्री नड्डांशी चर्चा, दुसरीकडे पोलिसांवर दगडफेक!!

    monsoon session 2026 : पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी पक्षाचे खासदार 15 मिनिटांत बाहेर पडले, नंतर पुन्हा आले, बंडखोर खासदारांना बैठकीत येण्यास विरोध

    FIFA Final : फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! FIFA वर्ल्ड कप फायनलसाठी राज्यातील हॉटेल्स पहाटे 4 वाजेपर्यंत राहणार सुरू