वृत्तसंस्था
भोपाळ : गोमूत्र घेतल्यास कोरोनाची लागण होत नाही असा दावा भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केला आहे. यापूर्वीही त्यांनी गोमुत्राचे औषधी फायदे सांगितले आहेत, यापूर्वी त्यांनी गोमूत्र घेतल्यामुळेच कॅन्सर बरा झाला होता, असा दावाही केला होता.To Prevent Coronavirus Take Cow Urine daily : pradnya singh Advise to people
भोपाळमधील कार्यक्रमात साध्वी प्रज्ञा सिंह म्हणाल्या की, जर दररोज देशी गायीचे मूत्र सेवन केले तर आपल्या फुफ्फुसांना कोरोनाची लागण होत नाही. सध्या मला खूप अस्वस्थ वाटतंय.
पण मी दरोज गोमूत्र प्राशन करते, म्हणूनच मला अजूनही कोरोनावरील कुठलेही औषध घ्यावे लागलेले नाही. मला कोरोनाची लागण झालेली नाही, तसेच देवाच्या कृपेने मला कुठल्याही औषधांची गरज भासणार नाही असेही साध्वी प्रज्ञा सिंह म्हणाल्या.
देशी गायीचेच मूत्र उपयोगी असते, असे त्या म्हणाल्या, तर जंगलात चरणार्या गायीचे मूत्र औषधी असते. ते साफ कपड्यांनी गाळायचे असते,
ते एका ऍसिड प्रमाणे काम करत असून त्यामुळे संपूर्ण पोट साफ होतं आणि कुठलेही पोटाचे विकार होत नाहीत, असा दावाही साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केला.
To Prevent Coronavirus Take Cow Urine daily : pradnya singh Advise to people
महत्त्वाच्या बातम्या
- संत्री खा, भरपूर आणि रोगमुक्त व्हा ! , व्हिटॅमिन ‘सी’ चा मोठा स्रोत ; कोरोना काळात वरदान
- शरद पवार राज्याचे नेते, पण त्यांनी फक्त बारामतीचाच विकास केला, त्यांनी उजनी धरणही बारामतीला पळविले असते; शिवसेना आमदाराचा “घरचा आहेर”
- Photos Cyclone Tauktae : चक्रीवादळ तौकतेने केला असा विध्वंस, या फोटोंमधून पाहा विविध शहरांचे हाल
- Coronavirus good news : पुण्यात रुग्णसंख्या हजाराचा आत ; अकरा हजार चाचण्यांत फक्त 700 जणांना कोरोनाची लागण
- मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात भाजपा कार्यकर्ते सहभागी होणार