• Download App
    लव्ह जिहादविरुध्द लढण्यासाठी ख्रिश्चन संघटना विश्व हिंदू परिषदेसोबत, हिंदू महासंमेलनात होणार सहभागी|To fight against Love Jihad, Christian organization will participate in Hindu Mahasammelan with Vishwa Hindu Parishad

    लव्ह जिहादविरुध्द लढण्यासाठी ख्रिश्चन संघटना विश्व हिंदू परिषदेसोबत, हिंदू महासंमेलनात होणार सहभागी

    विशेष प्रतिनिधी

    तिरुवनंतपुरम : केरळमध्ये हिंदूंबरोबरच ख्रिश्चन समाजही लव्ह जिहादमुळे धास्तावला आहे. मुस्लिमांकडून मुली पळवून नेण्याचे प्रकार वाढत असल्याने आता ख्रिश्चन संघटना विश्व हिंदू परिषदेसोबत आल्या आहेत. केरळमधील तिरुवनंतपुरम येथे आयोजित 10 व्या अनंतपुरी हिंदू महासंमेलनात ख्रिश्चन असोसिएशन आणि अलायन्स फॉर सोशल अ‍ॅक्शन या संस्था सहभागी होणार आहेत.To fight against Love Jihad, Christian organization will participate in Hindu Mahasammelan with Vishwa Hindu Parishad

    केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. हिंदू धर्म परिषदेने आयोजित केलेल्या ५ दिवसीय कार्यक्रमात प्रथमच ख्रिश्चन संघटना सहभागी झाल्या आहेत.हा गट लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि हलाल याविरोधात लढत आहे. विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष एम गोपाल म्हणाले, आमच्याकडे पूर्वी ख्रिस्ती लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते.



    पण या कार्यक्रमाला ख्रिश्चन संघटना सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. केरळमधील सध्याची परिस्थिती अशी आहे की हिंदू आणि ख्रिश्चनांनी एकत्र उभे राहिले पाहिजे. लव्ह जिहाद आणि लँड जिहाद यासारख्या समस्या दोन्ही समुदायांना भेडसावत आहेत. दोन्ही समुदाय सारख्याच संकटाचा सामना करत आहेत. इस्लामिक दहशतवाद दोन्ही समुदायांसाठी धोकादायक बनला आहे. डाव्या आणि इस्लामिक इतिहासकारांनी राज्याच्या इतिहासाचे चुकीचे चिणि केले आहे. इतिहासाला योग्य परिप्रेक्ष्यातून मांडायची गरज आहे.

    ख्रिश्चन असोसिएशन आणि अलायन्स फॉर सोशल अ‍ॅक्शनी के.एस. सॅमसन यांनी ‘लव्ह जिहाद’च्या धोक्याचा सामना करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे सहकार्य घेणार असल्याचे सांगितले आहे. लव्ह जिहादच्या अनेक प्रकरणात विश्व हिंदू परिषदेने मदत केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना अनेक प्रकरणांमध्ये मदत केली आहे.

    नुकताच ख्रिश्चन असोसिएशन आणि अलायन्स फॉर सोशल अ‍ॅक्शनने कोझिकोड जिल्ह्यातील कोडेनचेरी गावात लव्ह जिहादचे प्रकरण उघडकीस आणले होते. शेजिन नावाच्या मुस्लिम तरुणाने ज्योत्स्ना मेरी जोसेफ नावाच्या ख्रिश्चन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्याशी लग्न केले. सौदी अरेबियामध्ये परिचारिका म्हणून काम करणारी ज्योत्स्ना केरळमध्ये दुसऱ्याबरोबर लग्न करण्यासाठीआली होती.

    मात्र, ती शेजीनसोबत पळून गेली. मेरी जोसेफच्या पालकांनी कोडनचेरी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती की, त्यांची मुलगी बेपत्ता आहे. शेजीनवर पोलिसांनी कारवाई न केल्याने नातेवाईक व स्थानिकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. हे लग्न म्हणजे लव्ह जिहाद असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याला सीपीआय(एम) नेत्यांचा पाठिंबा असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला.

    असोसिएशनचे अध्यक्ष केविन पीटर म्हणाले, आम्ही राज्यातील 200 हून अधिक लव्ह जिहादची प्रकरणे उघडकीस आणली आहेत. सुमारे 90 मुलींना वाचवण्यात आम्हाला यश आले आहे. आम्ही लव्ह जिहाद प्रकरणे शोधण्यासाठी आणि स्थानिक धर्मगुरूंना सतर्क करण्यासाठी नोंदणी विभागाच्या वेबसाइटवरील तपशील देखील तपासतो. 10 पैकी 8 प्रकरणांमध्ये मुलींना त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप होतो.

    To fight against Love Jihad, Christian organization will participate in Hindu Mahasammelan with Vishwa Hindu Parishad

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र