• Download App
    तृणमुल कॉंग्रेसला अखेर झाली उपरती, टाटा समूहाला बंगालमध्ये उद्योग उभारण्यासाठी पायघड्या |TMC invites Tata in west Bengal

    तृणमुल कॉंग्रेसला अखेर झाली उपरती, टाटा समूहाला बंगालमध्ये उद्योग उभारण्यासाठी पायघड्या

    विशेष प्रतिनिधी

    कोलकता : पश्चिम बंगालमधील सिंगूर येथे टाटांच्या नॅनो प्रकल्पाच्या भूसंपादनाविरोधात आंदोलन करणाऱ्या तृणमूल काँग्रेसने आता त्याच उद्योगसमूहासाठी पायघड्या अंथरल्या आहेत. आमचे टाटांशी कधीच वैर नव्हते, आम्ही त्यांच्याविरोधात आंदोलन देखील केले नव्हते असे पक्षाच्या मंत्र्यांनी आता म्हटले आहे.TMC invites Tata in west Bengal

    राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री पार्थ चॅटर्जी म्हणाले, अनेक मोठ्या प्रकल्पांसाठी आमची टाटांसोबत बोलणी सुरू आहे. टाटा हा देशात आणि देशाबाहेर सर्वांत मोठा उद्योगसमूह असून तो सर्वांच्या आदरास पात्र आहे.



    सिंगूरच्या वादासाठी तुम्ही टाटांना जबाबदार ठरवू शकत नाहीत. तत्कालीन डाव्या पक्षाच्या सरकारने तिथे बळाचा वापर करून भूसंपादन करायला सुरुवात केली होती, त्यामुळे सगळी समस्या निर्माण झाली. टाटा उद्योगसमूहाचे बंगालमध्ये आम्ही स्वागतच करतो.

    टाटांना परत सिंगूरची जमीन देणार का? असा प्रश्नद विचारला असता चॅटर्जी म्हणाले, की ‘‘ टाटा सिंगूरमध्ये कशाला येतील? तेथील जमीन शेतकऱ्यांना परत देण्यात आली आहे. आम्ही तिथे कृषी आधारित उद्योग उभारणार आहोत.

    TMC invites Tata in west Bengal

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले