वृत्तसंस्था
म्हैसूर : म्हैसूरचा अत्याचारी शासक टिपू सुलतान याच्या नावावर असलेल्या टिपू सुपरफास्ट एक्स्प्रेसचे नाव रेल्वे मंत्रालयाने बदलून वोडेयार एक्स्प्रेस असे केले आहे. रेल्वेचे नाव बदलण्यावरून कर्नाटकात राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. भाजप समाजात द्वेषाचे राजकारण करत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे, तर भाजपने आता तुष्टीकरणाचे राजकारण करण्याचे दिवस गेले असल्याचा टोला काँग्रेसला लगावला आहे. या ट्रेनचे नाव बदलण्यासाठी म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांनी रेल्वेला पत्र लिहिले आहे.Tipu Superfast Express renamed as Wodeyar Express!!; Congress upset in Karnataka
गेल्या अनेक वर्षांपासून १२६१३ म्हैसूर – बेंगळुरू इंटरसिटी एक्सप्रेस टिपू सुपरफास्ट एक्सप्रेस म्हणून धावत होती, मात्र आता तिचे नाव बदलून वोडेयार एक्सप्रेस करण्यात आले आहे. म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांनी ट्रेनच्या नवीन बोर्डाचा फोटो लावला आणि रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले. प्रताप सिम्हा यांनी २५ जुलै रोजी पत्र लिहून या ट्रेनचे नाव बदलण्याची मागणी केली होती. रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत, ट्रेन क्रमांक १२६१३-१२६१४ म्हैसूर-बेंगळुरू टिपू एक्स्प्रेसचे नाव बदलून वोडेयार एक्स्प्रेस करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
ट्रेनच्या नवीन नावानंतर गदारोळ सुरू झाला
वोडेयार राज्य हे आधुनिक म्हैसूरचे शिल्पकार असल्याचे म्हटले जाते. सुमारे 150 वर्षांपूर्वी, वोडेयार यांनी म्हैसूर राज्यात रेल्वेचे जाळे तयार केले. मात्र या ट्रेनच्या नामकरणानंतर राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. सरकार ध्रुवीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहेत. त्याचवेळी भाजपचे म्हणणे आहे की जेव्हा या ट्रेनला टिपू सुलतानचे नाव देण्यात आले तेव्हा तुष्टीकरणाचे राजकारण होत होते आणि आता काळ बदलला आहे, त्यामुळेच या ट्रेनचे नावही बदलले आहे.
Tipu Superfast Express renamed as Wodeyar Express!!; Congress upset in Karnataka
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : शिवसेनेसाठी लकी राहिले धनुष्यबाण; ढाल तलवार, रेल्वे इंजिन आणि खजुराच्या झाडावर झाला पराभव
- PM Modi Gujarat Visit : पंतप्रधान मोदी आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर, विधानसभा निवडणुकीपूर्वी देणार विकासकामांची भेट
- अमित शाह मुलाखत : जम्मू – काश्मीर मध्ये मोकळ्या आणि पारदर्शक वातावरणातच निवडणूक, खालिक मॉडेलमधून नव्हे!!
- कला, कविता, लेखन, बॉलिवूडमध्ये मुस्लिमांचे सर्वाधिक योगदान; शरद पवारांचे प्रतिपादन