वृत्तसंस्था
श्रीनगर – जम्मू आणि काश्मिरमधील बारामुल्ला जिल्ह्यात लष्कराने घुसखोरीचा मोठा कट उधळला. यावेळी लष्कराने तीन दहशतवाद्यांचा ठार केले. त्याचप्रमाणे, मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे व दारूगोळाही जप्त केला.Three terrorist killed in Kashmir
एलओसीनजीक हथलंगा परिसरात संशयास्पद हालचाल दिसली. त्यानंतर, लष्कराच्या कारवाईत तीन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. यावेळी घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. यात सात पिस्तुल, ७० हातबॉम्ब आदींचा समावेश आहे.
लष्कराच्या चिनार कॉर्प्स मुख्यालयात या कारवाईबद्दल ले.जनरल डी.पी.पांडे म्हणाले, की गेल्या काही दिवसांत एलओसीच्या दुसऱ्या बाजूच्या लाँच पॅडवर कारवायांत वाढ झाली होती. या वर्षी आतापर्यंत घुसखोरी झाली नव्हती. मात्र, लाँच पॅडवर थोड्या हालचाली सुरू झाल्या.
पाकिस्तानी लष्कर आणि कमांडरना माहित असल्याशिवाय लाँच पडवर सक्रियता वाढू शकत नाही. लष्कराने घुसखोरीचा कट उधळला, यातून हे सिद्ध होते. उरी सेक्टरमध्ये १८ सप्टेंबरलाही दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव लष्कराने हाणून पाडला होता.
Three terrorist killed in Kashmir
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाबात भारत-पाकिस्तान सीमेवर तीन दहशतवाद्यांना अटक; हँड ग्रेनेड, 11 काडतुसे आणि पिस्तूल जप्त
- राज्यसभा बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसचे पटोले-थोरात फडणवीसांच्या भेटीला, सत्तेतील सहकारी राष्ट्रवादी-शिवसेना नाराज!
- सरकारने निवडणुकीची थट्टा मांडली, प्रभागरचनेचा उद्देश सांगावा, लोकांनी एकावेळी किती बोटं दाबायची? नाशकात राज ठाकरेंचा हल्लाबोल
- Corona Spread : लाओसच्या गुफांमध्ये आढळली कोरोनाचा संसर्ग पसरवणारी वटवाघुळे, शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा