वृत्तसंस्था
श्रीनगर : भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात ऑल आऊट मोहीम आखली असून दहशतवाद्यांचा सफाया करण्यास सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत लष्कर-ए-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. Three Lashkar-e-Taiba militants arrested in Jammu and Kashmir
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी सोमवारी रात्री प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या ३ दहशतवाद्यांना अटक केली.
संरक्षण प्रवक्ता (श्रीनगर) यांच्या म्हणण्यानुसार, उत्तर काश्मीरमधील शांतता बिघडवण्याचा कट रचणाऱ्या दहशतवाद्यांकडून शास्त्र सामग्रीही जप्त करण्यात आली आहे. अलीकडेच अनंतनागमध्ये सुरक्षा दलांनी लष्कराच्या एका दहशतवाद्याचा खात्मा केला.