Gayatri Prasad Prajapati Sentenced To Life Imprisonment : चित्रकूट अल्पवयीन सामूहिक बलात्कार प्रकरणात समाजवादी पक्षाच्या सरकारमधील मंत्रिपदी राहिलेल्या गायत्री प्रसाद प्रजापतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गायत्री प्रजापती यांना गुरुवारी दोषी ठरवण्यात आले. माजी मंत्री गायत्री प्रसाद प्रजापती यांच्यासह तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रत्येकी दोन लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. Three Accused Including Gayatri Prasad Prajapati Sentenced To Life Imprisonment
वृत्तसंस्था
लखनऊ : चित्रकूट अल्पवयीन सामूहिक बलात्कार प्रकरणात समाजवादी पक्षाच्या सरकारमधील मंत्रिपदी राहिलेल्या गायत्री प्रसाद प्रजापतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गायत्री प्रजापती यांना गुरुवारी दोषी ठरवण्यात आले. माजी मंत्री गायत्री प्रसाद प्रजापती यांच्यासह तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रत्येकी दोन लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गायत्री प्रसाद प्रजापती, अशोक तिवारी आणि आशिष शुक्ला यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे तिघेही सामूहिक बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत दोषी आढळले. या प्रकरणात विकास वर्मा, अमरेंद्र सिंग ऊर्फ पिंटू, चंद्रपाल, रुपेश्वर उर्फ रुपेश यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
काय आहे प्रकरण?
गायत्री प्रसाद प्रजापती हे उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे सरकारचे असताना खाण मंत्री राहिले आहेत. गायत्री आणि इतर सहा जणांवर चित्रकूटच्या एका महिलेने तिच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या महिलेने सांगितले की, ती मंत्री गायत्री प्रजापती यांच्या घरी पोहोचली होती. त्यानंतर मंत्री आणि त्याच्या साथीदारांनी नशा करून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. तक्रारीनंतर गायत्री प्रजापतीच्या वतीने कुटुंबीयांना धमकावल्याची बाबही समोर आली.
कुटुंबाला एफआयआर नोंदवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागले. सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर गायत्री प्रजापतीविरुद्ध गौतमपल्लीमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर गायत्री प्रजापती व इतर आरोपींना अटक करून तुरुंगात रवानगी झाली होती.
Three Accused Including Gayatri Prasad Prajapati Sentenced To Life Imprisonment
महत्त्वाच्या बातम्या
- लखीमपूर खेरी हिंसाचार : SIT तपासावर लक्ष ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने यूपी सरकारला सुचवली दोन नावे, सोमवारपर्यंत निर्णय घेण्याची मुदत
- हिंदुत्व म्हणजे मुसलमान – शिखांना मारणे!!; राहुल गांधींनी केला हिंदुत्वावर नवा आरोप
- झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या नावे सिनेमा बनवला, पैसे कमावले, त्या खाल्ल्या मिठाला तरी जागायचे होते, रुपाली चाकणकरांचा घणाघात
- PAK vs AUS : सेमीफायनलच्या आधी दोन रात्री मोहम्मद रिझवान आयसीयूमध्ये होता, पाकचे फलंदाजी प्रशिक्षक मॅथ्यू हेडन यांचा खुलासा
- ‘आपलं म्हणायचं आणि घात करायचा ‘ ; कर्मचाऱ्यांच्या निलंबनावरून पडळकरांनी टोला लगावला