• Download App
    झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या नावे सिनेमा बनवला, पैसे कमावले, त्या खाल्ल्या मिठाला तरी जागायचे होते, रुपाली चाकणकरांचा घणाघातMade a movie in the name of Rani Lakshmibai of Jhansi, made money, wanted to wake up to the salt she ate, Rupali Chakankar

    झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या नावे सिनेमा बनवला, पैसे कमावले, त्या खाल्ल्या मिठाला तरी जागायचे होते, रुपाली चाकणकरांचा घणाघात

    केंद्र सरकारने हे सिद्ध करून दाखवावे की आपण अशा देशद्रोह्यांना पाठीशी घालत नाही,अस देखील रुपाली चाकणकर म्हणाल्या.Made a movie in the name of Rani Lakshmibai of Jhansi, made money, wanted to wake up to the salt she ate, Rupali Chakankar


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.यात ती म्हणाली की , भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती,आणि खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले आहे. यामुळे आता एक नवीनच वाद निर्माण झाला आहे.कंगनाच्या या वक्तव्यावरुन भाजपाच्या नेत्यांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.दरम्यान राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील कंगनाला जोरदार टोला लगावला आहे.

    यावेळी रुपाली चाकणकर म्हणाल्या की , देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आणि प्राणांची आहुती दिलेल्या प्रत्येकाचा हा अपमान आहे. ज्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या नावे सिनेमा बनवला, पैसे कमावले,त्या खाल्ल्या मिठाला तरी जागायचे होते, अशी टीका रुपाली चाकणकर यांनी अभिनेत्री कंगना राणावतवर केली आहे.



    पुढे त्या म्हणाल्या की देशाची एकता, अखंडता आणि अस्मिता यामध्ये फूट पाडणाऱ्या कंगना राणावतचा पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारने काढून घेण्याची मागणी केली आहे.तसेच तिच्यावर देशाद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि केंद्र सरकारने हे सिद्ध करून दाखवावे की आपण अशा देशद्रोह्यांना पाठीशी घालत नाही,अस देखील रुपाली चाकणकर म्हणाल्या.

    Made a movie in the name of Rani Lakshmibai of Jhansi, made money, wanted to wake up to the salt she ate, Rupali Chakankar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sahar Sheikh : आमची सर्व कागदपत्रे कायदेशीर; MIM नगसेविका सहर शेख म्हणाली- सगळे आरोप बिनबुडाचे

    CM Devendra Fadnavis : संभाव्य एल निनोला टक्कर देण्यास महाराष्ट्र सज्ज; उपलब्ध पाण्याचे नियोजन व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा- CM देवेंद्र फडणवीस

    CM Devendra Fadnavis : विरोधकांनी 70 कोटी महिलांचा विश्वासघात केला; काँग्रेस, तृणमूल, द्रमुक, सपा ते ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष महिलांविरोधी, CM देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल