• Download App
    जागतिक आरोग्य संघटनेच्या डॅशबोर्डवर जम्मू काश्मीर पाकिस्तानचा तर अरुणाचल प्रदेश दाखविला चीनचा भाग|The World Health Organization's dashboard shows Jammu and Kashmir as part of Pakistan and Arunachal Pradesh as part of China

    जागतिक आरोग्य संघटनेच्या डॅशबोर्डवर जम्मू काश्मीर पाकिस्तानचा तर अरुणाचल प्रदेश दाखविला चीनचा भाग

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेच्या कोव्हिड-१९ डॅशबोर्डमध्ये जम्मू काश्मीर हा पाकिस्तानचा तर अरुणाचल प्रदेश हा चीनचा भूभाग असल्याचं दाखवलं जात असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे खासदार शंतनू सेन यांनी केला आहे.The World Health Organization’s dashboard shows Jammu and Kashmir as part of Pakistan and Arunachal Pradesh as part of China

    पंतप्रधान नरेंद्र मोदींना रविवारी एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये जागतिक आरोग्य संघटनेसंदर्भात सेन यांनी एक तक्रार पंतप्रधानांकडे केली आहे. सेन यांनी पत्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार ते स्वत: जागतिक आरोग्य संघटनेचा हा डॅशबोर्ड पाहताना ही गोष्ट लक्षात आली. मी जेव्हा या साईटवरील निळ्या भागावर क्लिक केलं तेव्हा आपल्या देशातील कोव्हिड-१९ बद्दलची माहिती दाखवण्यात आली होती.



    मात्र मला धक्का बसला जेव्हा मी वेगळ्या रंगाच्या भागावर क्लिक केलं. या ठिकाणी आपल्या जम्मू काश्मीर राज्यावर क्लिक केलं तेव्हा पाकिस्तानची माहिती दाखवण्यात आलेली. असंच चीनसंदभार्तील माहितीबद्दलही या साईटवर दिसून आले. ही अंतरराष्ट्रीय स्तरावरील एक गंभीर बाब असून याची सरकारने दखल घेऊन ती सुधारली पाहिजे.

    हे आपल्या देशातील नागरिकांसाठी फार खेदजनक आहे. केंद्रीय गृहमंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाबरोबरच आरोग्य खात्यालाही सेन यांनी या पत्राची एक एक प्रत पाठवलीय. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

    The World Health Organization’s dashboard shows Jammu and Kashmir as part of Pakistan and Arunachal Pradesh as part of China

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : गृहमंत्री शहा म्हणाले- आसामसारखे पूर्ण देशातून घुसखोरांना हाकलून लावू; आसामचे स्वातंत्र्यसैनिक गोपीनाथ यांनी नेहरूंना आसाम भारतात ठेवण्यासाठी भाग पाडले

    Rahul Gandhi : राहुल म्हणाले- सेवानिवृत्त सैनिकांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचार मिळत नाही; निश्चित सुविधा आणि रोजगारही नाही

    Mamata Banerjee : ममता म्हणाल्या- माझ्यावर तुष्टीकरणाचे आरोप, पण मी धर्मनिरपेक्ष; लोक गुरुद्वारात गेल्यावर शांत राहतात