• Download App
    'आदिपुरुष' चित्रपटाच्या निर्मात्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा दिलासा; उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती! The Supreme Court gave a big relief to the makers of the movie Adipurush Suspension of the order of the High Court

    ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या निर्मात्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा दिलासा; उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती!

    इतर उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यांनाही स्थगिती दिली आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आदिपुरुष चित्रपटाच्या निर्मात्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे CBFC प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीवर शुक्रवारी (21 जुलै) सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. सुप्रीम कोर्टाने म्हटले की, “सीबीएफसी आपले काम करते. त्यांनी जारी केलेल्या प्रमाणपत्राला दिलेल्या आव्हानावर थेट सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकत नाही.’’ The Supreme Court gave a big relief to the makers of the movie Adipurush Suspension of the order of the High Court

    यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली, ज्यामध्ये चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक आणि संवाद लेखक यांना प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले होते. सुप्रीम कोर्टाने या चित्रपटाविरुद्धच्या इतर उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यांनाही स्थगिती दिली आहे.

    अलाहाबाद उच्च न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश दिले होते

    अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात आदिपुरुष चित्रपटाच्या निर्मात्यांनी बुधवारी (१२ जुलै) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या वकिलाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाची बाब मुख्य न्यायमूर्तींसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु मुख्य न्यायमूर्तींनी उद्या त्यांच्यासमोर सुनावणीसाठी विनंती ठेवावी, असे सांगितले.

    विशेष म्हणजे अलाहाबाद उच्च न्यायालयाने आदिपुरुष चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत, निर्माता भूषण कुमार, संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना २७ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. यासोबतच उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला या चित्रपटाबाबत आपले म्हणणे मांडण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देशही दिले होते.

    The Supreme Court gave a big relief to the makers of the movie Adipurush Suspension of the order of the High Court

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!