• Download App
    सलाम...!! इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्सच्या जवानांच्या धाडसाला; काबूलमधून भारतीय दूतावासातले अधिकारी-कर्मचारी, नागरिक सुरक्षित आणले The situation is bad in #Afghanistan but we managed to successfully evacuate our people, which is a matter of pride for all of us. Our troops have not slept for 3-4 days

    सलाम…!! इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्सच्या जवानांच्या धाडसाला; काबूलमधून भारतीय दूतावासातले अधिकारी-कर्मचारी, नागरिक सुरक्षित आणले

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : सलाम आहे, त्या जवानांना…!! ज्यांनी धाडसाने तीन-चार दिवस – रात्र खपून अफगाणिस्तान मधल्या भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची आणि नागरिकांची सुरक्षा वाहिली आणि काळजी घेतली एवढेच नव्हे तर अत्यंत असुरक्षित वातावरणात आपल्या जीवाची जोखीम पणाला लावून त्यांनी अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांना भारतामध्ये सुरक्षित परत आणले. ही धाडसी आणि अव्वल दर्जाची कामगिरी आहे, अफगाणिस्तानात आत्तापर्यंत तैनात राहिलेल्या इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्सच्या जवानांची…!! The situation is bad in #Afghanistan but we managed to successfully evacuate our people, which is a matter of pride for all of us. Our troops have not slept for 3-4 days

    भारतीय दूतावास तालिबान्यांच्या सातत्याने टार्गेटवर आहे. तिथे एवढे असुरक्षित वातावरण आहे की केव्हा, कोठून, कसा हल्ला होईल सांगता येत नाही, अशा स्थितीत आम्ही कर्तव्य बजावत भारतीय अधिकारी कर्मचारी आणि अन्य नागरिकांचे संरक्षण करीत होतो, असे अफगाणिस्तानातल्या तिबेटियन बॉर्डर फोर्सच्या जवानांचे प्रमुख कमांडर रविकांत गौतम यांनी भारतात परतल्यानंतर पत्रकारांना सांगितले.

    कमांडर गौतम म्हणाले की, अफगाणिस्तानातील अवस्था दिवसेंदिवस खराब होत राहणार आहे. अशा स्थितीत लवकरात लवकर भारतीय नागरिकांची सुरक्षित सुटका करणे आणि त्यांना सुरक्षित भारतात आणणे हे आमचे प्रथम कर्तव्य होते. गेले तीन-चार दिवस आम्ही कोणीही अधिकारी आणि जवान झोपलेलो नाही. आज सर्व भारतीय आम्ही सुरक्षित परत आणल्यानंतर रात्रीची सुखनैव झोप आम्ही मी घेऊ शकतो.

    अफगाणिस्तानातल्या फौजांनी कोणताही प्रतिकार न करता शरणागती पत्करली. त्यामुळे तालिबान्यांचा विजय झाला. त्यांना अफगाणिस्तानात रान मोकळे मिळाले, अशी माहिती त्यांनी दिली. तेथे कुणाचीही जीवन आणि मालमत्ता सुरक्षित उरलेले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

    परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्सच्या धाडसी जवानांचे अभिनंदन केले असून भारतीय दूतावासातील सर्व अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांना सुरक्षितरित्या परत आणल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

    काबूल विमानतळावरची अफरातफर एवढी भयानक होती की तेथे काही तासांसाठी टिकून राहणे देखील कठीण होते. परंतू जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि भारतीय नागरिकांना सुरक्षित ठिकाणी कुरते तात्पुरते आश्रयस्थान तयार केले. तेथेही धोका होताच परंतु आपले जवान सातत्याने पहाऱ्यावर असल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही, असे कमांडर रविकांत गौतम यांनी स्पष्ट केले. नवी दिल्लीत परतल्यानंतर सर्व जवानांनी आणि भारत भारतीयांनी भारत माता की जय अशा जोरदार घोषणा दिल्या.

    The situation is bad in #Afghanistan but we managed to successfully evacuate our people, which is a matter of pride for all of us. Our troops have not slept for 3-4 days

    विशेष प्रतिनिधी

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!