• Download App
    माजी मुख्यमंत्र्यांची मेव्हणी बेघर, रस्त्यावर बेवारस अवस्थे फिरताना आढळल्या|The sister-in-law of the former chief minister was found homeless, wandering in the streets

    माजी मुख्यमंत्र्यांची मेव्हणी बेघर, रस्त्यावर बेवारस अवस्थे फिरताना आढळल्या

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या मेव्हणी बेघर असून कोलकत्ता येथील रस्त्यावर बेवारस अवस्थेत फिरताना त्या दिसल्या. एकेकाळी शिक्षिका म्हणून काम करणाºया ७२ वर्षीय इरा बसू या कोलकात्याच्या एका फुटपाथवर आयुष्य कंठत आहेत.The sister-in-law of the former chief minister was found homeless, wandering in the streets

    इरा बसू या राज्याचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांची पत्नी मीरा भट्टाचार्य यांची बहीण असल्याचं समजल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. बैरकपूर पोलिसांनी शहरातील मानसिक रुग्णालयात हलविले. इरा बसू या काही वर्षांपासून मानसिकरित्या आजारी असल्याचं समोर येतंय. गेल्या अनेक वर्षांपासून त्या बेघर आहेत. काही वर्षांपूर्वी बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या अनेक सभांत त्या दिसल्या होत्या.



    १९७६ ते २००९ पर्यंत प्रियनाथ बालिका विद्यालयात त्यांनी शिक्षिका म्हणून काम केलं. पश्चिम बंगालच्या राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्समध्ये १०० मीटर धावण्यातही त्यांनी बक्षीस मिळवलं होतं. याशिवाय त्या टेबल टेनिस आणि क्रिकेटही खेळत होत्या. २००९ साली सरकारी शाळेतून त्या सेवानिवृत्त झाल्या.

    निवृत्तीनंतर त्यांना मासिक पेन्शन मिळवण्याचा हक्क मिळाला होता. परंतु, आजवर पेन्शन मिळवण्यासाठी त्यांच्याकडून दावा करण्यात आला नाही. पेन्शन मिळवण्यासाठी दाखल करावी लागणारी आवश्यक कागदपत्रं जमा न केल्यानं त्यांना पेन्शनचा लाभ मिळत नसल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका कृष्णकली चंद्रा यांनी म्हटलंय.

    त्या अतिशय मेहनती शिक्षिका होत्या. परंतु, मानसिक संतुलन ढासळल्यानं आपल्या कामकाजाच्या शेवटच्या काही वर्षांत त्या अनेकदा अनवाणी शाळेत दाखल होत होत्या, त्यांच्या अंगावर घाणेरडे कपडे असत. तसेच त्या उद्ध्वस्त दिसत होत्या, अशी माहिती शाळेतील काही शिक्षकांनी दिली.

    सेवानिवृत्तीनंतर त्या एका माजी मुख्याध्यापिकांच्या घरी राहत होत्या. मात्र, आपल्या माजी सहकारी मुख्याध्यापिकांचा मृत्यू झाल्यानंतर त्या फुटपाथवर राहण्यासाठी निघून गेल्या. तेव्हापासून त्या इथंच आपलं जीवन जगत होत्या.

    The sister-in-law of the former chief minister was found homeless, wandering in the streets

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!