• Download App
    भारताच्या संरक्षणाची “सप्तशक्ती”; 7 नव्या कंपन्या ठरतील भारताच्या सैन्यशक्तीचा मजबूत पाया । The "seven powers" of India's defense; 7 New companies will be a strong foundation of India's military power

    भारताच्या संरक्षणाची “सप्तशक्ती”; ७ नव्या कंपन्या ठरतील भारताच्या सैन्यशक्तीचा मजबूत पाया

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : आजच्या विजयादशमीच्या मुहूर्तावर स्थापन करण्यात आलेल्या सात नव्या कंपन्या भारतीय सैन्यशक्तीचा मजबूत पाया ठरतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. देशातील ४१ ऑर्डिनान्स फॅक्टरीजचे रूपांतर केंद्र सरकारने ७ नव्या कंपन्यांमध्ये करून आज नवे पाऊल टाकले आहे. या कंपन्यांची स्थापना आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या ७ नव्या कंपन्या देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनाची मोठी गरज भागविणार आहेत. नवे संशोधन आणि नवे उत्पादन यावर या कंपन्यांचा भर असणार आहे, अशी ग्वाही देखील पंतप्रधानांनी दिली.

    The “seven powers” of India’s defense; 7 New companies will be a strong foundation of India’s military power या ७ कंपन्या पुढील प्रमाणे असतील – Munitions India Limited (MIL); Armoured Vehicles Nigam Limited (AVANI), Advanced Weapons and Equipment India Limited (AWE India), Troop Comforts Limited (TCL), Yantra India Limited (YIL); India Optel Limited (IOL) and Gliders India Limited (GIL).

    या कंपन्यांना सुरूवातीलाच तब्बल ६६ कॉन्ट्रॅक्टस् मिळाली असून त्या ऑर्डरची किंमत ६५००० कोटी रूपये आहे. या कंपन्यांमधून सैन्य दलांच्या तीनही विंग्ज लष्कर, हवाई दल, नौदल यांच्या सामग्रीचे उत्पादन आणि वितरण करण्यात येणार आहे. निमलष्करी दलाच्या उपयोगाची शस्त्रे आणि उपकरणे देखील या कंपन्यांमधून तयार करण्यात येतील.

    दुसऱ्या महायुध्दाच्या काळात ब्रिटिशांनी भारतीय इंजिनिअर्स आणि कामगारांचा आणि भारतीय रिसोर्सेचा आपल्या सैन्यासाठी उपयोग करण्यासाठी ऑर्डिनान्स फॅक्टरीज अर्थात दारूगोळा कारखाने उघडले होते. सध्या यांची संख्या ४१ आहे. मात्र, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या फॅक्टरींमध्ये नवे तंत्रज्ञान आणले गेले नाही. त्यांची क्षमता वापरली गेली नाही. त्यातून देशाच्या सैन्य़शक्तीची शस्त्रांची आणि उपकरणांची गरज पुरेशी भागविली गेली नाही.

    मात्र, मोदी सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेतून य़ा ऑर्डिनान्स फॅक्टरीजचे रूपांतर ७ कंपन्यांमध्ये करून त्याची मालकी आणि भांडवल १०० टक्के सरकारी ठेवले आहे. यामध्ये प्रोफेशनल मनुष्यबळ, नवे तंत्रज्ञान या आधारे उत्पादन करण्यात येईल. ही उत्पादने भारतीय सैन्य दलांना उपलब्ध करून देण्याबरोबरच शस्त्रास्त्रे – सामग्री आणि उपकरणांची निर्यात देखील करण्यात येणार आहे.

    The “seven powers” of India’s defense; 7 New companies will be a strong foundation of India’s military power

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले