प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयत्यावेळी हेलिकॉप्टरने जाण्याऐवजी रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सुरक्षाव्यवस्थेत गडबड झाली, असा दावा पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी केला आहे तो प्रत्यक्ष सरकारी कागदपत्रांच्या पुराव्यांच्या आधारे खोटा ठरताना दिसत आहे. The Punjab government was given a clear alert on January 1, 2, 4 regarding the security of the Prime Minister !!; Revelations from government notes
न्यू इंडियन एक्सप्रेसने कागदपत्रांचा शोध घेऊन दिलेल्या बातमीत अनेक बाबींचा स्पष्ट खुलासा होताना दिसत आहे. पंजाब सरकारला एकदा ननव्हे, तर तीनदा सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात स्पष्टपणे नेमक्या स्वरूपाचे अलर्ट देण्यात आले होते. 1, 2, 4 जानेवारी रोजी वेगवेगळ्या नोट्स सरकारला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
या सर्व नोट्सचा नीट अभ्यास केला असता खालील बाबी स्पष्ट होतात.
- पंतप्रधानांच्या दौर्यात हवामानाचा अडथळा आला पाऊस किंवा वादळ या स्वरूपाच्या नैसर्गिक आपत्ती आल्या तर पंतप्रधान हेलिकॉप्टर ऐवजी रस्ते मार्गाने फिरोजपूरला जाऊ शकतात हे स्पष्टपणे कळवण्यात आले होते.
- यासाठी फिरोजपूर हुसैनीवाला मार्गाची व्यवस्था करणे तेथील सुरक्षा व्यवस्था लामबंध करणे तसेच हुसैनीवाला च्या आसपास जास्तीत जास्त उसाची शेते आहेत. ट्यूब वेल आहेत त्यामुळे या परिसरात जमिनीखाली स्फोटके ठेवण्याचा प्रकार घडू शकतो. तेथे जास्तीत जास्त स्नीफर डॉग्स तसेच अत्याधुनिक धातूशोधक यंत्र द्वारे परिसराची छाननी करावी, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली होती.
- टिफिन बॉक्स बाॅम्ब, ड्रोन हालचाली यावर विशेष लक्ष ठेवण्यात यावे, अशी स्पष्ट सूचना या नोट्स मध्ये आहे.
- त्याचबरोबर पंतप्रधानांच्या दौऱ्याचा नेमका रस्ता/ पर्यायी रस्ता याबाबत प्रोटोकॉल नुसार तयारी ठेवावी.
- पंतप्रधानांच्या संपूर्ण दौऱ्याच्या वेळी कोठेही शेतकरी आंदोलक किंवा अन्य घटक अडथळा आणू शकतात हे लक्षात घेऊन त्यानुसार पंतप्रधानांच्या मार्गामध्ये कोणताही अडथळा उत्पन्न होऊ नये यासाठी पर्याप्त बंदोबस्त तैनात करावा.
- त्याचबरोबर पंतप्रधानांच्या रॅलीच्या ठिकाणीदेखील प्रोटोकॉल नुसार बंदोबस्त ठेवून शेतकरी आंदोलक रॅलीमध्ये जाऊन गोंधळ घालणार नाही त्याची पूर्वतयारी करावी.
- फिरोजपूर रॅलीच्या ठिकाणी सुमारे एक लाख लोक जमले असल्याची माहिती स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सरकारच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना आणि आपल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविली होती. हेही नोट्स मधून स्पष्ट झाले आहे.
या स्वरूपाच्या स्पष्ट सूचना 1, 2, 4 जानेवारीच्या प्रत्येक नोट मध्ये देण्यात आल्या आहेत. पंजाबच्या पोलीस महासंचालकांना तसेच 11 अतिरिक्त पोलीस महासंचालकांना पोहोचविण्यात आल्या होत्या.
पंतप्रधानांच्या दौर्यात नेमके कुठे अडथळे येऊ शकतात ते कोणत्या स्वरूपाचे असू शकतात याचे स्पष्ट निर्देश या नोट्स मध्ये करण्यात आले आहेत. अशा स्थितीत मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी यांनी पंतप्रधानांनी आपला निर्णय बदलून हेलिकॉप्टर ऐवजी रस्ते मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला असा जो दावा केला आहे तो सरकारी कागदपत्रांच्या आधारे खोटा ठरताना दिसत आहे.
The Punjab government was given a clear alert on January 1, 2, 4 regarding the security of the Prime Minister !!; Revelations from government notes
महत्त्वाच्या बातम्या
- काँग्रेसची एकीकडे स्वबळाची तयारी; दुसरीकडे आपल्याच मंत्र्यांविरुद्ध 7-8 आमदारांची नाराजी!!
- ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरकडून ‘83’ चित्रपटासह रणवीर सिंहचे कौतुक
- PURANDAR AIRPORT : महाविकासआघाडी सरकारला धक्का! संरक्षण मंत्रालयाकडून पुरंदर विमानतळाच्या जागेची मान्यता रद्द
- “आमच्यावर होणाऱ्या वैयक्तिक आरोपांना उत्तर देत बसू नका , तर …..” ;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे