विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या जनतेने लोकशाहीसाठी कीड ठरलेल्या घराणेशाही, जातीयवाद व तुष्टीकरणाच्या राजकारणाला हद्दपार केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात योगींनी सुरु केलेल्या विकास यात्रेला आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.The people banished the politics of dynasticism, casteism and nationalism, which were a pest for democracy, Amit Shaha said
उत्तर प्रदेशात दैदीप्यमान विजय मिळविल्यानंतर योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदी निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे अमित शहा यांच्यासह योगींनी राजभवनात जाऊन राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे 272 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र व नव्या मंत्र्यांची यादी सुपूर्द केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देवही उपस्थित होते.
लखनौच्या लोकभवनात आयोजित भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत गुरुवारी योगी आदित्यनाथ यांची पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. शाहजहानपूर मतदार संघातून सलग 9 व्यांदा निवडून आलेल्या आमदार सुरेश खन्ना यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला बेबी राणी मौर्य, सूर्यप्रताप शाही, नंद गोपाल गुप्ता नंदीसह 5 आमदारांनी अनुमोदन दिले. सध्या उप मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांच्या नावाविषयीचा सस्पेंस कायम आहे.
उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या पूर्वी समाजवादी पक्षाने आव्हान उभे केल्याचे वातावरण तयार केले होते. मात्र, उत्तर प्रदेशातील जनतेने समाजवादी पक्षाच्या घराणेशाही आणि तृष्टीकरणाच्या राजकारणाला नाकारले. भाजपला मोठ्या मताधिक्यानेविजयी केले.
The people banished the politics of dynasticism, casteism and nationalism, which were a pest for democracy, Amit Shaha said
महत्त्वाच्या बातम्या
- ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोनिया गांधींच्या समोरच काँग्रेसवर केला हल्लाबोल, ठरवले एअर इंडियाच्या दुर्दशेला जबाबदार
- नाशकात भगवी शॉल घालून ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटासाठी गेलेल्या महिलांना रोखलं, थिएटरबाहेरच काढायला लावली गळ्यातील शॉल, भाजपची मुख्यमंत्र्यांवर टीका
- कोरोनामुळे मृत्यूंचा घोटाळा : नुकसानभरपाईच्या खोट्या दाव्यांवर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, महाराष्ट्रासह 3 राज्यांतून पडताळणी
- Uniform Civil Code : पहिल्या कॅबिनेट बैठकीत उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामींची मोठी घोषणा, समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय, निवडणुकीत दिले होते आश्वासन