२००३ पर्यंत केवळ देशात केवळ एकच AIIMS होती.
प्रतिनिधी
नवी दिल्ली : मागील नऊ वर्षांत केंद्र सरकारने देशातील पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर दिला आहे. रस्ते, रेल्वे कनेक्टिव्हिटी असो किंवा देशाच्या आरोग्य क्षेत्रातील बदल असोत, या वर्षांत सर्वसामान्यांनी देशात अभूतपूर्व बदल पाहिले आहेत. पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात एम्सची संख्या सात वरून २२ झाली आहे. आठ वर्षांपूर्वी देशात एम्सची संख्या केवळ सात होती. The number of AIIMS in the country increased to 22 during the regime of Prime Minister Modi
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आरोग्य सुविधांचा झपाट्याने विकास झाला आहे. काँग्रेसच्या ६० वर्षांच्या राजवटीत देशात केवळ एकच एम्स होते. २००३ पर्यंत देशातील एम्स रुग्णालयाची संख्या एकच होती आणि त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पाच नवीन एम्स स्थापन करण्याची योजना आखली होती. सन २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक राज्यात एम्स स्थापन करण्याचे धोरण आखले आणि त्याअंतर्गत एम्सची संख्या आता २२ झाली आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी लोकसभेत सांगितले की २२ मंजूर एम्स पैकी भोपाळ (मध्य प्रदेश), भुवनेश्वर (ओडिशा), जोधपूर (राजस्थान), पटना (बिहार), रायपूर (छत्तीसगड) आणि ऋषिकेश (उत्तराखंड) ) येथे स्थित सहा AIIMS पूर्णपणे कार्यरत आहेत. मांडविया म्हणाले की उर्वरित १६ एम्स ऑपरेशनच्या विविध टप्प्यात आहेत.
मांडविया यांनी सांगितले की, या २२ एम्समुळे देशातील आरोग्य सेवा प्रणालीमध्ये एमबीबीएसच्या २४५७ जागा आणि १८ हजार २५० खाटांची संख्या वाढणार आहे. मंत्री म्हणाले की २२ AIIMS पैकी अवंतीपोरा (काश्मीर), रेवाडी (हरियाणा) आणि दरभंगा (बिहार) वगळता उर्वरित १९ ठिकाणी अद्यापही एमबीबीएस अभ्यासक्रम चालवला जात आहे.
The number of AIIMS in the country increased to 22 during the regime of Prime Minister Modi
महत्वाच्या बातम्या
- टेन्शन वाढलं! : रशियन विमानांनी पाडले अमेरिकी ड्रोन, अमेरिकेने दिला कठोर इशारा
- Kerala : पलक्कडमध्ये भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांवर जीवघेणा सशस्त्र हल्ला!
- महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांवरील सर्वोच्च सुनावणीचा आज शेवटचा दिवस!
- तिजोरीवर पेन्शनचा भार पडणार तरी किती??; कोटीच्या कोटी उड्डाणांची वाचा टक्केवारी!!