विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली निघालेल्या प्रकरणांची संख्या मोठ्या प्रमाणात असून या वर्षातील पहिल्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून एका दिवसात १५.५० लाखापेक्षा जास्त प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. या माध्यमातून वाहतूक विभागाला ६९ कोटी पेक्षा जास्त रुपयांचा महसूल मिळाला आहे. The National People’s Court disposed of 1.5 million cases More than 69 crore revenue to transport department
यामध्ये मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, बँकाचे वसुलीचे दावे कोर्टात प्रलंबित असलेले तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, वैवाहिक प्रकरणे, धनादेश अनादर झाल्याचे खटले, बीज कंपन्यांनी दाखल केलेले खटले वित्त संस्था तसेच भ्रमणध्वनी कंपन्या यांची रक्कम वसूली प्रकरणे व पोलीसाची वाहतूक चलनाबाबतची प्रकरणे मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेली होती.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील ३४ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे, ३ उच्च न्यायालय विधी सेवा समिती/ उपसमित्या आणि ३०९ तालुका विधी सेवा समित्या येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १४८७ पॅनल ठेवण्यात आलेली होती.
या पॅनलसमोर ६५ लाखापेक्षा जास्त दाखलपूर्व प्रकरणे आणि ४ लाख प्रलंबित प्रकरणे अशी एकूण ६९ लाख प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी सायंकाळ पर्यंत प्राप्त झालेल्या माहितीप्रमाणे १५ लाखापेक्षा जास्त वाद दाखलपूर्व प्रकरणे, ५० लाखापेक्षा जास्त प्रलंबित प्रकरणे आणि विशेष बैठकीमध्ये ७२ हजार ४८८ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
महाराष्ट्रातील वाहतूक विभागाची ट्रॅफीक ई-चलानची ६० लाखापेक्षा जास्त प्रकरणे वाद दाखलपूर्व स्वरुपात राष्ट्रीय लोक अदालतीसमोर ठेवण्यात आली होती. त्यामध्ये १४ लाखापेक्षा जास्त प्रकरणे तडजोड होऊन निकाली निघाली. त्यामधून वाहतूक विभागाला ६९ कोटीपेक्षा अधिक महसूल प्राप्त झाला. या सर्व ३६ लाख प्रकरणांमध्ये संबंधित पक्षकारांना ऑनलाईन नोटीस पाठविण्यात आल्या होत्या.
न्यायमूर्ती उदय ललित (कार्यकारी अध्यक्ष, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली) अशोक जैन ( सदस्य सचिव राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली ) यांनी आभासी पध्दतीच्या तंत्रज्ञानाने मुंबई, नाशिक आणि नागपूर येथील पॅनलवरील सदस्य आणि पक्षकार यांच्याशी संवाद साधला. पुढील राष्ट्रीय लोक अदालत ७ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे.
The National People’s Court disposed of 1.5 million cases More than 69 crore revenue to transport department
महत्त्वाच्या बातम्या
- पत्नीने खोटी तक्रार दाखल करणे पतीचा छळच, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्वाळा
- ग्वाल्हेरच्या महाराजांनी हातात घेतला झाडू, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या कृतिने घडविला इतिहास
- JALNA : काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांची भाजपमध्ये एन्ट्री ! विकासासाठी मी नेहमीच कमळासोबतगोरंट्याल – त्यावर भागवत कराड म्हणतात जालण्याचा विकास करण्यासाठी कायमचं या आमच्यासोबत …
- चित्रपटांमध्ये पोलीसांची प्रतिमा चुकीच्या पध्दतीने दाखविणे देशाचे दुर्दैव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खंत