• Download App
    The Kashmir Files : काश्मीर मध्ये "त्यावेळी" जे झाले ते विसरून समाजात एकता टिकवावी; शरद पवारांचे वक्तव्य |The Kashmir Files: Forget about what happened in Kashmir "at that time" and maintain unity in the society; Statement of Sharad Pawar

    The Kashmir Files : काश्मीर मध्ये “त्यावेळी” जे झाले ते विसरून समाजात एकता टिकवावी; शरद पवारांचे वक्तव्य

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : काश्‍मीरमध्ये 1990च्या दशकात जे झाले ते विसरून जावे आणि देशाचे ऐक्य टिकवावे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. त्याच वेळी त्यांनी “द काश्मीर फाईल्स” या सिनेमामुळे देशातले वातावरण खराब होत असून एक विचार त्यामुळे मारला जातो आहे. देशातले बंधुप्रेम संपवले जात आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.The Kashmir Files: Forget about what happened in Kashmir “at that time” and maintain unity in the society; Statement of Sharad Pawar

    शरद पवार यांनी या आधी देखील “द काश्मीर फाईल्स” वर निशाणा साधला होता. परंतु, आज युवक काँग्रेसच्या मेळाव्यात देखील त्यांनी पुन्हा एकदा या सिनेमावर शरसंधान केले. या सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.



    परंतु त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी 1990 च्या दशकात काश्मीरमध्ये जे घडले ते वाईटच होते. परंतु त्यावेळी विश्वनाथ प्रताप सिंग यांचे सरकार केंद्रात होते. भारतीय जनता पार्टीचा या सरकारला पाठिंबा होता. राज्यपाल कोण होते, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळी अनेकांना विस्थापित व्हावे लागले. परंतु हे सगळे विसरून जाऊन देशाचे ऐक्‍य टिकवावे, असे विधान शरद पवार यांनी केले आहे. “सगळे विसरण्याचे” विधान केल्यामुळे त्यावर राजकीय वर्तुळात वादंग सुरू झाला आहे.

    शरद पवार म्हणाले :

    एका चित्रपटामुळे एक विचार मारला जातोय. त्यात गांधीजी, नेहरू यांचा काय संबंध? यातून देशातले बंधुप्रेम संपवले जात आहे.

    दु:ख याचे आहे की पंतप्रधान कुठल्याही पक्षाचे असोत त्यांना देश एक ठेवणं महत्वाचे असते. मात्र पंतप्रधान म्हणतात चित्रपट चांगला आहे. महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात एका दुपारी एकही आमदार सदनात नव्हता. ते सगळे चित्रपट पाहायला गेले होते. असेच सुरू राहिले तर देशात एकता राहणार नाही.

    देशातील धर्मनिरपेक्षतेवर भाजपचा विश्वास नाही. त्यात काही पाठिंबा भाजपला मिळाला आणि सत्ता त्यांच्याकडे आली. एक चित्रपट येतो, त्यात काश्मिरी पंडितांवर हल्ले झाले आणि ते हल्ले काँग्रेस आणि अल्पसंख्यांकांनी केले हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. हिंदुंवर अत्याचार झाले हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे.

    काश्मिरी पंडितांच्या विस्थापनावेळी व्ही. पी. सिंग सत्तेवर होते. त्यांना भाजपचा पाठिंबा होता. मुफ्ती मोहम्मद गृहमंत्री, राज्यपाल कोण होते?, हे सगळ्यांना माहिती आहे.

    आता त्याचा मुद्दा तयार केला जातो. त्याची जबाबदारी तेच घेऊ शकतात. जे काही झालं ते देशासाठी चांगलं झालं नाही. त्या लोकांना इकडे यावं लागलं ही चांगली गोष्ट नव्हती. पण जे झाले गेले ते विसरून समाजात एकता कशी राहील हे पाहिले पाहिजे.

    The Kashmir Files: Forget about what happened in Kashmir “at that time” and maintain unity in the society; Statement of Sharad Pawar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य