विशेष प्रतिनिधी
दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी एका हिंदी दैनिकात दिलेल्या लेखामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांच्यावर कडाडून टीका केली आहे. ‘हम कैसे भूल जाएंगे ओ दौर’ या लेखामध्ये त्यांनी कोरोना काळामध्ये सरकारने केलेल्या हलगर्जीपणाबद्दल केंद्र सरकारला चांगलेच सुनावले आहे. मोदी सरकारने कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान दाखवलेल्या अक्षम्य बेजबाबदारपणामुळेच अनेक लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला होता आणि हे खूपच दु:खद आणि दुर्दैवी धोरण केंद्र सरकारने अवलंबले होते. असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.
The irresponsibility of the central government led to the loss of lives in the second wave; Sonia Gandhi
त्याचप्रमाणे त्या म्हणतात, जेव्हा कोरोनाची दुसरी लाट पीकवर होती तेव्हा पंतप्रधान आणि गृहमंत्री गायब झाले होते. आणि जेव्हा कोरोनाची दुसरी लाट गेली त्यानंतर ते पुन्हा समोर आले. सरकारच्या बेजबाबदार धोरणामुळे सातत्याने लोकांचे जीव जात होते. इतका वेळा इशारा देऊनही एखादं सरकार इतके कसे काय निष्क्रिय राहू शकते असा प्रश्नदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
भारताने 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला. त्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले आहे. पण यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरण्यास साफ नकार दिला आहे. हे शास्त्रज्ञ, नर्सेस, डॉक्टर यांचे क्रेडिट असून नरेंद्र मोदी हे फक्त इव्हेंट मॅनेजमेंटची संधी प्रत्येक गोष्टींमधून शोधत असतात. अशी टीका करत नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसादिवशी दोन कोटी लसीकरण पूर्ण करण्यात आले होते. मग हे रोज का नाही होऊ शकत? असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.
The irresponsibility of the central government led to the loss of lives in the second wave; Sonia Gandhi
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान