• Download App
    काँग्रेस पक्षासाठी निवडणूक व्यवस्थापन आणि डिजिटल मार्केटिंग करणाऱ्या कंपनीवर आयकर विभागाने टाकला छापा | The Income Tax Department has raided a company that conducts election management and digital marketing for the Congress party

    काँग्रेस पक्षासाठी निवडणूक व्यवस्थापन आणि डिजिटल मार्केटिंग करणाऱ्या कंपनीवर आयकर विभागाने टाकला छापा

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागत असतानाच, आता आणखी एक नवीन बातमी आली आहे. आसाम आणि इतर राज्यांमध्ये काँग्रेस पक्षासाठी निवडणूक व्यवस्थापन आणि डिजिटल मार्केटिंग करणार्या डिझाइन्ड बॉक्स या कंपनीवर आयकर विभागाने 12 ऑक्टोबर रोजी छापा टाकला होता. या कंपनीमध्ये बेहिशोबी मालमत्ता सापडल्याचा आयकर विभागाने म्हटले आहे.

    The Income Tax Department has raided a company that conducts election management and digital marketing for the Congress party

    चंदीगड, मोहाली, सूरत, बेंगळूर अशा एकूण सात ठिकाणी ही शोधमोहीम राबवण्यात आली होती. त्याचप्रमाणे डिझाइन्ड बॉक्स या कंपनीच्या एमडी यांच्या हॉटेलच्या रुमचे मध्ये देखील ही झडती घेण्यात आली होती.


    Chhattisgarh Congress : घोषणापत्रात शराबबंदी ! ‘थोड़ी-थोड़ी पीया करो’ महिला बालकल्याण मंत्री अनिला भेडिया यांचा महिलांना अजब सल्ला


    यासंबंधी प्राप्तिकर विभागाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या छाप्यादरम्यान अनेक संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे बेहिशोबी मालमत्तेच्या उत्पन्नाचे आणि मालमत्तेच्या स्थलांतर हस्तांतरणाचे देखील पुरावे मिळाले आहेत. कंपनीने कमीत कमी महसूल दाखवला असून जाणीवपूर्वक वाढीव खर्च दाखवला आहे.

    हा समूह बेहिशोबी रोख देयकांमध्ये ही सहभागी असल्याचे आढळून आले आहे. त्याचप्रमाणे कंपनीच्या संचालकांनी आपला वैयक्तिक खर्चदेखील कंपनीचा व्यावसायिक खर्च म्हणून नोंदवला आहे. संचालक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या वापरासाठी कंपनीच्या कर्मचारी आणि प्रवेशकाच्या नावावर अलिशान वाहने खरेदी केली गेली आहेत. अशी माहिती आयकर विभागाने दिली आहे.

    The Income Tax Department has raided a company that conducts election management and digital marketing for the Congress party

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली