• Download App
    मालगाडी थेट पार्किंगमध्ये घुसली; हरियाणातील धक्कादायक घटना; काळजाचा ठोका चुकवला । The goods train lost control and entered the parking area at the railway station at haryana

    मालगाडी थेट पार्किंगमध्ये घुसली; हरियाणातील धक्कादायक घटना; काळजाचा ठोका चुकवला

    वृत्तसंस्था

    फरिदाबाद : हरियाणाच्या ओल्ड फरिदाबाद रेल्वे स्टेशनवर एक मालगाडी थेट भिंत तोडून पार्किंगमध्ये घुसली. अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. The goods train lost control and entered the parking area at the railway station at haryana

    मालगाडी भिंत तोडून पार्किंगमध्ये घुसल्याने रेल्वे स्टेशन परिसरात खळबळ माजली. एका रेल्वे कर्मचाऱ्याचा जीव सुदैवाने थोडक्यात बचावला. रेल्वे निरीक्षक एके गोयल यांनी सांगितले की, सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. ट्रेनच्या मागे उभा असलेला रेल्वे कर्मचारी नशीब बलवत्तर म्हणून सुखरुप बचावला. पण, रेल्वे अपघातानं सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला.



    रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, सिमेंटची भरलेली पोती घेऊन मालगाडी गंगापूरहून ओल्ड फरिदाबाद स्टेशनला पोहचली. ट्रेन माल उतरवण्यासाठी मागील बाजूस जात होती. तेव्हा रेल्वे यार्डमध्ये जाताना लोको पायलट आणि कर्मचारी यांच्यातील संवाद तुटला त्यामुळे मालगाडीचा मागील डबा संरक्षक भिंत तोडून थेट पार्किंग एरियात घुसला.

    The goods train lost control and entered the parking area at the railway station at haryana

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : द फोकस एक्सप्लेनर : ऑपरेशन सिंदूरनंतर PM मोदी आदमपूरला का गेले? जाणून घ्या, पाकला घाम फोडणाऱ्या एअरबेसबद्दल

    Operation sindoor : मराठ्यांनी 1758 मध्ये अटकेपार लावले झेंडे; त्यानंतर तब्बल 267 वर्षांनी भारताने तिथपर्यंत बॉम्ब आणि ब्राह्मोस पोहोचवले!!

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट