• Download App
    कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांनी खरेदी केली आयुष्यातील पहिली वहिली कार, किंमत तब्बल एक कोटी रुपये|The former Chief Minister of Karnataka bought the first car in his life, priced at Rs one crore

    कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांनी खरेदी केली आयुष्यातील पहिली वहिली कार, किंमत तब्बल एक कोटी रुपये

    विशेष प्रतिनिधी

    बेंगळुरू : माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी आयुष्यातील पहिली वहिली कार खरेदी केली आहे तीदेखील तब्बल एक कोटी रुपयांची. मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यावर त्यांना वाहनाची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी टोयाटो व्हेलफायर ही सात आसनी आलिशान मोटार खरेदी केली आहे.The former Chief Minister of Karnataka bought the first car in his life, priced at Rs one crore

    येडीरुप्पा यांनी २६ जुलै रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते मानसिक तणावात होते. त्यामुळे ते कुटुंबासहित मालदवीमध्ये सुट्टी घालविण्यासाठी गेले होते. परत आल्यावर त्यांनी ही कार खरेदी केली आहे.



    आत्तापर्यंत येडीयुरप्पा यांना स्वत:च्या कारची गरज नव्हती. मुख्यमंत्री किंवा विरोधी पक्षनेते या नात्याने शासकीय वाहनांचा वापर ते करत होते. गरज पडल्यास मुलगा बी.वाय. विजयेंद्र यांची कारही ते वापरत होते. २०१८ च्या निवडणुकीतल प्रतिज्ञापत्रानुसार येडीयुरप्पा यांच्याकडे कोणतेही वाहन नव्हते.

    येडीयुरप्पा यांनी खरेदी केलेल्या टोयाटा वेलफायरची किंमत 87 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. करांसह किंमत एक कोटी रुपये झाली आहे.येडीयुरप्पा १९८० च्या दशकापासून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. शिवमोगा जिल्ह्यात ते सायकलवर फिरत असत. त्यावेळी कर्नाटक विधानसभेत त्यांच्यासह भाजपचे फक्त दोन आमदार होते. सायकलवरून फिरणाऱ्या येडीयुरप्पा यांची त्या काळात चांगलीच चर्चा होती.

    The former Chief Minister of Karnataka bought the first car in his life, priced at Rs one crore

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

     Indian Citizenship : दरवर्षी 2 लाख लोक परदेशात स्थायिक होत आहेत; 5 वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले

    Shivraj Singh Chouhan : शिवराज यांच्यावर पाक गुप्तचर संस्था ISI कडून हल्ल्याचे इनपुट; गृह मंत्रालयाचे सुरक्षा वाढवण्याचे आदेश

    मोदींच्या भाजपचा नवा धक्का; ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड मोडला!!, भाजपमध्ये मोठ्या बदलाची चुणूक