• Download App
    देशाला सहा महिन्यात वीजटंचाईला सामोरे जावे लागेल; कोळसा टंचाईच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांचा गर्भित इशारा|The country will have to face power shortage in six months; warning of Nitin Gadkari

    देशाला सहा महिन्यात वीजटंचाईला सामोरे जावे लागेल; कोळसा टंचाईच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांचा गर्भित इशारा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशाला सहा महिन्यात वीजटंचाईला सामोरे जावे लागेल, असा गर्भित इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.The country will have to face power shortage in six months; warning of Nitin Gadkari

    नितीन गडकरी यांनी एरोसिटीमध्ये आंतरराष्ट्रीय वैश्य महासंमेलनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात देशाच्या विकासासाठी सरकारकडून तयार करण्यात येत असलेल्या रोडमॅपवर सविस्तर माहिती दिली. पुढे जायचे असेल तर तंत्रज्ञानावर भर द्यावा लागेल.



    वीजेच्या संकटावर ते म्हणाले,काही दिवसांपूर्वी कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्याने वीज निर्मिती केंद्राकडे जेमतेम कोळशाचा साठा उपलब्ध होता. यामुळे केंद्रीय ऊर्जा विभागाने युद्धपातळीवर आढावा बैठका घेत कोळसा उपलब्धीसाठी प्रयत्न करत केले होते. त्यामुळे देशासमोर उभे असलेले वीजेचे संकट काही प्रमाणात टळले होते.

    ते म्हणाले, “सरकारी डिस्कॉम्सची अवस्था अत्यंत वाईट आहे. नजीकच्या भविष्यात भारताला अधिक ऊर्जेची गरज भासणार आहे. कारण देशाच्या आर्थिक विकासाला वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात वीजटंचाईचा सामना करावा लागू शकतो,” असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

    ऊर्जा विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार ३ लाख ८८ हजार मेगावॅट एवढी देशात वीजेची मागणी आहे. यापैकी सरासरी ५२ टक्क्यांपेक्षा जास्त वीज म्हणजे सुमारे २ लाख २ हजार मेगावॅट वीजेची निर्मिती ही निव्वळ कोळशापासून केली जाते. देशातील एकूण गरजेपैकी सुमारे ३० टक्के कोळसा हा आयात केला जातो.

    मात्र गेल्या काही दिवसांत युरोपमध्ये विशेषतः चीनमधून कोळशाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर कोळशाच्या किंमतीही काही प्रमाणात वाढल्या आहेत. तसेच देशांत अनेक ठिकाणी झालेली अतिवृष्टी, आलेला पूर याचा परिणाम कोळशा खाणींवर झाला आहे आणि कोळशाच्या वाहतुकीवरही मर्यादा आल्या आहेत.

    या सर्व परिस्थितीचा फटका हा कोळशापासून वीज निर्मिती करणाऱ्या केंद्रांना बसला आहे. तसेच ऑक्टोबर मध्ये दरवर्षीप्रमाणे वीजेची मागणी ही वाढली. या सर्व गोष्टीमुळे यापुढील दिवसांत देशात वीजेच्या उपलब्धतेवर संकट येण्याची शक्यता आहे.

    The country will have to face power shortage in six months; warning of Nitin Gadkari

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार