विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाला नव्या राज्यघटनेची गरज आहे. ती काळानुसार बदलावी, ती नव्याने लिहिण्याची गरज असल्याचे परखड मत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांनी व्यक्त केले. The country needs a new constitution; Telangana Chief Minister K. Chandrasekhar Rao’s proposal; Insistence to increase the powers of the states
पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यघटना नव्याने लिहिण्याचा प्रस्ताव मांडला असून त्यावर देशभर चर्चा घडवून आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यापूर्वी वेळोवेळी राज्यघटनेत बदल केले आहेत. एक नव्हे तर तब्बल ८० वेळा सुधारणा केल्या आहेत. आता ७५ वर्ष पूर्ण झाल्यावर राज्यघटना काळानुसार नव्याने लिहिण्याची गरज निर्माण झाली आहे.
केंद्र आणि राज्यांचे अधिकार या मुद्यावर त्यांचा जोर होता. राव म्हणाले, राज्यांचे सर्व अधिकार हे केंद्राकडे एकवटले आहेत. त्यामुळे राज्य स्वतः मोकळेपणाने काम करू शकत नाही. एक राष्ट्र, एक नोंदणी याचा काय अर्थ होतो. एखादा आयएएस अधिकारी राज्यातून केव्हाही केंद्राकडे बदली करून पळविला जातो. केंद्राने राज्यांना त्यांचे अधिकार वापरण्याचा अधिकार हा दिला पाहिजे. आम्ही तेलंगणात पंचायत राज्य अंतर्गत जसा निधी, सुविधा गावात पूर्ववत आहोत. त्या प्रमाणे केंद्राने राज्यांना मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
देशाला नव्या राज्यघटनेची गरज आहे, हे मी माझ्या ५० वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यातील अनुभवावरून सांगत आहे. त्यात वावगे असे काही नाही. राज्यघटना लिहून अनेक वर्षे झाली आहेत. काळ बदलला आहे. त्यामुळे ती ही काळा प्रमाणे बदलली पाहिजे, असे ते म्हणाले.
The country needs a new constitution; Telangana Chief Minister K. Chandrasekhar Rao’s proposal; Insistence to increase the powers of the states
महत्त्वाच्या बातम्या
- गोव्यात राष्ट्रवादीची 24 स्टार प्रचारकांची मोठ्ठी यादी, पण नेमके उमेदवार तरी किती??
- समाजवादी पक्ष म्हणजे सडलेला माल, कयामतच्या दिवसापर्यंत सत्तेवर येणार नाही, योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
- केंद्रीय कर्मचाऱ्यांची पाची बोटे तुपात; महागाई भत्त्यात १४ टक्क्यांनी वाढ
- देशातील तीन कोटी लोकांना लखपती कसे बनविले, पंतप्रधानांनी सांगितला मार्ग
- गलवानवर मोठा खुलासा : चकमकीत चीनचे ३८ सैनिक नदीत वाहून गेले, मात्र केला फक्त ४ सैनिकांचा मृत्यू झाल्याचा कांगावा