विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि त्यांची विचारधारा कारणीभूत असल्याचा आरोप गेल्या ६० वर्षांपासून केला जात आहे. यावरून संघावर बंदीही घालण्यात आली होती. मात्र, काँग्रेस किंवा अन्य पक्ष हा आरोप सिद्ध करू शकले नाहीत. कोणताही पुरावा नसताना केवळ बदनामीसाठी असा आरोप केला जात आहे.The Congress, which has blamed the RSS for Gandhi’s assassination, has never provided any evidence. Will it take action against them? Question by Indresh Kumar
हा सुद्धा द्वेष पसरवण्याचाच प्रकार असून असा निराधार आरोप करणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी केला.आरएसएस राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार म्हणाले, महात्मा गांधी यांच्या हत्येवरून काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून सातत्याने आरएसएसवर आरोप केले जातात.
एका हिंदुत्ववादी व्यक्तीने महात्मा गांधी यांची हत्या केली, असे विधान राहुल गांधी यांनी केले होते. हे सुद्धा प्रक्षोभक विधान ठरते, असे इंद्रेश म्हणाले. चिथावणी देणारे विधान कुणीही करोत. त्याकडे एकाच चष्म्यातून पाहायला हवे. कारवाईत पक्षपात असता नय.
इंद्रेश कुमार यांनी शब्दांत धर्म संसदेतील प्रक्षोभक भाषणांचा निषेध केला. एखाद्या व्यासपीठावरून चिथावणी देणारी वक्तव्ये केला जात असतील व दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्यावर कायदेशीर कारवाई ही झालीच पाहिजे.
मात्र, द्वेषाचं राजकारण आणि भ्रष्टाचार या दोन्ही गोष्टी तितक्याच घातक असून राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनीही अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे. दोन धर्म एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार नाहीत हे पाहायला हवे. एका समाजाला दुसऱ्या समाजाविरुद्ध चिथावणी देऊन काहीही साध्य होणार नाही. त्यापेक्षा देश आणि सर्व भारतीयांच्या व्यापक हितासाठी बंधुभाव आणि विकास केंद्रस्थानी ठेवून राजकारण केले गेले पाहिजे.
The Congress, which has blamed the RSS for Gandhi’s assassination, has never provided any evidence. Will it take action against them? Question by Indresh Kumar
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशात असदुद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर गोळीबार; केंद्र आणि राज्य सरकारकडे चौकशीची मागणी
- भारतात पहिली EMU ट्रेन धावली ९७ वर्षांपूर्वी
- संसदेत भाषेवरून वाद : इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नाला ज्योतिरादित्य सिंधियांनी हिंदीत दिले उत्तर, थरूर म्हणाले – हा तर अपमान!
- मोठी बातमी : चीनमधील हिवाळी ऑलिम्पिक उद्घाटन समारंभाला भारताचे राजदूत जाणार नाहीत, दूरदर्शनवर प्रसारणही नाही