विशेष प्रतिनिधी
रायपूर : लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात विरोधी साक्ष दिली म्हणून कॉंग्रेसच्या नेत्याने आपल्याच पक्षातील नेत्याला भर रस्त्यात बेदम चोपले. छत्तीसगडच्या बालोद येथे हा प्रकार घडला.काँग्रेस नेते राजेश शाहू यांनी त्याच गावातले दुसरे नेते छक्कन शाहू यांना बेदम मारहाण केली.The Congress leader beat his own party leader in the street
राजेश शाहू यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. यावेळी छक्कन शाहू यांनी त्यांच्याविरोधात साक्ष दिल्यामुळे राजेश शाहू यांना तुरुंगाची हवा खावी लागली. तुरुंगातून जामीनावर बाहेर आलेल्या राजेश शाहू यांनी काही कार्यकर्त्यांसह छक्कन यांच्या दुकानाकडे मोर्चा वळवला आणि त्यांना मारहाण करायला सुरुवात केली.
हातात लाठ्याकाठ्या घेऊन आपल्यावर जमावानिशी चालून येणाºया राजेश शाहू यांना पाहून छक्कन शाहू यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र राजेश शाहू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग करून त्यांना पकडले आणि बेदम मारहाण केली.
भर रस्त्यातून मारहाण करत करत त्यांना पुन्हा दुकानापर्यंत आणले गेले. त्यानंतर त्यांना दुकानासमोरच बांधून घातलं आणि सर्वांनी मिळून पुन्हा एकदा त्यांना बेदम चोप देत आपला राग काढला.यावेळी छक्कन शाहू यांचा बचाव करण्यासाठी त्यांची पत्नी आणि मुलगा पुढं सरसावले. पण राजेश शाहू यांनी छककन यांची पत्नी आणि मुलालाही त्यांनी बेदम चोप दिला.
या मारहाणीत छक्कन आणि त्यांचे कुटुंबीय जबर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. छक्कन यांनी राजेश शाहूंविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. मात्र एकाच पक्षाच्या या दोन नेत्यांमध्ये भर चौकात रंगलेल्या हाणामारीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
The Congress leader beat his own party leader in the street
महत्त्वाच्या बातम्या
- Core Sector Output : आठ कोअर सेक्टरमध्ये मे महिन्यात 16.8 टक्के वाढ, सरकारकडून आकडेवारी जाहीर
- अजितदादांच्या आणि सुनेत्रा पवारांच्या नातेवाईकांचा जरंडेश्वर साखर कारखाना ED कडून जप्त
- डिजिटल इंडियाला 6 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पीएम मोदींचा लाभार्थींशी संवाद, कोरोना काळात डिजिटल कनेक्टिव्हिटीचे महत्त्व केले विशद
- केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर कोव्हिशील्ड लसीला 9 युरोपीय देशांनी दिली मान्यता, कोव्हॅक्सिनबद्दलही गुड न्यूज
- टी-सिरीजचे संस्थापक गुलशन कुमार हत्याप्रकरणी अब्दुल राशिद दाऊद मर्चंटला जन्मठेपेची शिक्षा, मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल