• Download App
    महाराष्ट्रातीलतील ओमायक्रॉनवर आता केंद्राचे लक्ष, दहा राज्यांमध्ये पथके करणार तैनात्|The Center will now focus on OmayaCron in Maharashtra, deploying squads in ten states

    महाराष्ट्रातीलतील ओमायक्रॉनवर आता केंद्राचे लक्ष, दहा राज्यांमध्ये पथके करणार तैनात्

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : महाराष्ट्रासह  राजस्थान आणि दहा राज्यांत वाढत असलेल्या ओमायक्रॉनवरआता केंद्र शासन लक्ष ठेवणार आहेत. 10 राज्यांमध्ये मल्टी-डिसीप्लीनरी पथके तैनात केली जातील. ही अशा राज्यात जातील जिथे ओमायक्रॉन, कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत किंवा लसीकरणाची गती मंद आहे, असे  केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे.The Center will now focus on OmayaCron in Maharashtra, deploying squads in ten states

    केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोराम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाबमध्ये या टीम तैनात असेल. ही पथके तीन ते पाच दिवस राज्यात तैनात राहतील आणि राज्याच्या आरोग्य अधिकाºयांसोबत काम करतील. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, पाळत ठेवणे, कंटेनमेंट आॅपरेशन्सवर लक्ष ठेवले जाईल



    ही टीम विशेषत: कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, पाळत ठेवणे, कंटेनमेंट आॅपरेशन्स आणि कोरोना चाचणीचे निरीक्षण करतील. हे पथक रुग्णालयांमध्ये खाटांची उपलब्धता, रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करतील. याशिवाय कोविड-19 लसीकरणाचा वेग वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे.

    राज्यस्तरीय केंद्रीय संघ परिस्थितीचे मूल्यांकन करतील. चांगले उपचार सुचवतील आणि सार्वजनिक आरोग्य उपक्रमांसाठी उचललेल्या पावलांचा अहवाल रोज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारांना सादर करतील.

    यूपीच्या रायबरेली जिल्ह्यात राज्यातील तिसरा ओमायक्रॉन प्रकरणाची पुष्टी झाली आहे. 15 डिसेंबरला अमेरिकेतून रायबरेलीला परतलेल्या मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याआधी 17 डिसेंबरच्या संध्याकाळी गाझियाबादमध्ये वृद्ध जोडपे ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळले होते. अशाप्रकारे, देशात आतापर्यंत ओमायक्रॉनची एकूण 416 प्रकरणे आढळून आली आहेत.

    The Center will now focus on OmayaCron in Maharashtra, deploying squads in ten states

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!