वृत्तसंस्था
कोलकाता : मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सुरु केलेला अवॉर्ड वापसी डाव आता लिबरल्स वरच उलटला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी त्यांना बांगला साहित्य अकादमीने दिलेला साहित्य सेवा पुरस्कार त्यांच्यावरच एक प्रकारे उलटला आहे. कारण बांगला पश्चिम बंगालमधल्या प्रख्यात लेखिका रत्ना रशीद बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी यांना दिलेल्या पुरस्काराच्या निषेधार्थ आपल्याला त्याच अकादमीचा मिळालेला पुरस्कार परत केला आहे. The Bengali writer returned the award in protest of the award given to Mamata Banerjee
ममता बॅनर्जी यांनी फार मोठी साहित्यसेवा केली आहे, अशी स्तुतिसुमने उधळत बांगला साहित्य अकादमीने त्यांना नुकताच पुरस्कार दिला होता. परंतु त्यावर पश्चिम बंगाल मध्ये साहित्य वर्तुळात संताप दिसून येत आहे. या संतापाचा उद्रेक रत्ना रशीद बॅनर्जी यांच्या पुरस्कार वापसीतून पुढे आला आहे.
ममता बॅनर्जी या लेखिका जरूर आहेत. त्यांच्या काही कविता आणि कथा प्रसिद्ध देखील झाल्या आहेत. परंतु बांगला साहित्य अकादमीच्या पुरस्कार हा दीर्घकाळ साहित्यसेवा केलेल्या आणि दर्जेदार साहित्य निर्माण करणाऱ्या साहित्यिकांना देण्याचा प्रघात आहे. हा प्रघात मोडून बांगला साहित्य अकादमीने ममता बॅनर्जी यांना पुरस्कार दिल्याची भावना रत्ना रशिद बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे आणि त्यांनी आपल्याला 2019 मध्ये मिळालेला बांगला अकादमीचा अंनद शंकर साहित्य पुरस्कार परत केला आहे.
या संदर्भात त्यांनी पश्चिम बंगालचे शिक्षण मंत्री बांगला साहित्य अकादमीचे अध्यक्ष ब्रत्य बसू यांना पत्र लिहून आपली नाराजी स्पष्टपणे कळविली आहे. मुख्यमंत्र्यांना पुरस्कार देऊन तुम्ही चुकीचा पायंडा पाडत आहात. त्याच्या निषेधार्थ मी पुरस्कार परत करते आहे, असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
बांगला अकादमीचे सदस्य आनंद शंकर बंदोपाध्याय यांनी देखील ममता बॅनर्जी यांना पुरस्कार दिल्याच्या निषेधार्थ अकादमीचा राजीनामा दिला आहे. बांगला साहित्य अकादमीने ममता बॅनर्जी यांच्या 900 कवितांचा एक संग्रह प्रकाशित केला आहे. त्याला देखील आनंद शंकर बंदोपाध्याय यांनी विरोध केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात 2014 नंतर ॲवार्ड वापसीची मोहीम उघडण्यात आली होती. साहित्य अकादमी पासून विविध पुरस्कार विजेत्या डाव्या विचारवंतांनी आणि साहित्यिकांनी पुरस्कार परत केले होते. परंतु पुरस्कार परत करताना त्यांनी फक्त ट्रॉफी, सायटेशन परत केली होती. पुरस्काराच्या रकमा परत केल्या नव्हत्या. आता 7 वर्षांनी बंगालमध्ये पुरस्कार वापसीची पुनरावृत्ती होत ती ममता बॅनर्जी यांच्यावर उलटताना दिसत आहे.
The Bengali writer returned the award in protest of the award given to Mamata Banerjee
महत्वाच्या बातम्या
- NIA Court : काश्मिरी दहशतवादी बिट्टा कराटे, शब्बीर शाह, हाफिज सईद, सय्यद सलाउद्दीनवर युएपीए आरोपपत्र दाखल!!
- सिध्दू म्हणतात, पंजाबमध्ये आता गद्दारांची खैर नाही, कॉँग्रेसच्या नाकावर टिच्चून घेतली मुख्यमंत्री मान यांची भेट
- NFHS Survey : स्री – पुरुष समानतेच्या दिशेने; 82% महिला पतीला सेक्ससाठी थेट नकार देऊ शकतात, तर 66% पुरुष म्हणतात, “इट्स ओके”!!