विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मोदी सरकार देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्राला गुंतवणुकीचा मोठा बुस्टर डोस देणार आहे. भारतीय विमान प्राधीकरणात (एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया) येत्या चार ते पाच वर्षांत २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. विमानतळावर प्रवाशांसाठी उच्च पायाभूत सुविधा मिळणार आहेत. गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या फटक्यामुळे विमानतळ प्राधीकरणाचे उत्पन्न २९७६.१७ कोटी रुपयांवरून ८८९ कोटी रुपयांपर्यंत कमी झाले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.The aviation industry will get a booster dose, the Modi government will invest Rs 25,000 crore for domestic air transport
नागरी विमान वाहतूक राज्य मंत्री व्ही. के. सिंह यांनी संसदेमध्ये सांगितले की ऑगस्ट २०१८ मध्ये बायोमेट्रिक आधारित डिजीटल प्रोसेसिंग सेवा (डीजी यात्रा प्लॅटफॉर्म) धोरण सुरू करण्यात आले होते. यामध्ये विमानाने प्रवास करणाऱ्यांना विमानतळाच्या गेटपासून बोर्डींग पॉईँटपर्यंत कोणत्याही निर्बंधाविना आणि कागदपत्रांशिवाय पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवाशांना बोर्डींग पासची गरज राहणार नाही
. यासाठी बंगळुरू, हैद्राबाद, कोलकत्ता, पुणे, वाराणसी आणि विजयवाडा विमानतळांना जबाबदारी देण्यात आली होती. या यंत्रणेची सध्या ट्रायल सुरू आहे. या विमानतळांवर चेहरा पडताळणी (फेस रिकगनिशन) तंत्रज्ञानाचा वापर करून बायोमेट्रिक बोर्डींग सिस्टिम कार्यान्वित करण्यात आली आहे. या विमानतळांवरील यंत्रणा यशस्वीपणे कार्यान्वित झाल्यार संपूर्ण देशात विविध टप्यांमध्ये सुरू करण्यात येणार
हवाई वाहतूक क्षेत्रात सुधारणेसाठी सरकार अनेक योजनांवर काम करत असल्याचे सांगून व्ही. के. सिंह म्हणाले, सध्या असलेल्या धावपट्यांची संख्या वाढविणे, त्यांचे मजबुतीकरण करणे, नवी टर्मीनल उभारणे, कंट्रोल टॉवरसहित अन्य सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी गुंतवणूक केली जाणार आहे.
सरकारने देशात २१ ग्रीनफिल्ड विमानतळांच्या उभारणीसाठी तत्वत: मंजुरी दिली आहे. पब्लिक-प्राइवेट पार्टनरशिप तत्वानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या आणि नव्याने उभारल्या जात असलेल्या विमानतळांमध्ये खासगी क्षेत्राची गुंतवणूक वाढविण्याचे धोरण आखले आहे.
२७ जुलै २०२१ पर्यंत प्रादेशिक पातळीवर कनेक्टिव्हीटी वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामध्ये ३५९ नवे हवाई मार्ग सुरू करण्यात आले आहेत. यामधील ५९ विमानतळ आत्तापर्यंत वापरता नव्हते. त्याचबरोबर दोन वॉटर एअरोड्रोम आणि पाच हेलीपोर्टही वापरात आणण्यात आले आहेत.
कमी लांबीच्या मार्गावर इंधनाची बचत करण्यासाठी व्यवस्थापन करण्यासाठी भारतीय वायू सेनेसोबत समन्वय साधला जात आहे. विस्तारा एअरलाईन्सने आत्तापर्यंत दोन नव्या वाईड-बॉडी विमानांची खरेदी केली आहे.
आगामी काही वर्षांत देशात २१ नवे विमानतळ सुरू होणार आहेत. त्याचबरोबर देशात सहा ग्रीनफिल्ड विमानतळांचे संचालन सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्रातील शिर्डी, सिक्किममधील पकयोंग, पश्चिम बंगालमधील दुर्गापूर, केरळमधील कन्नूर, कर्नाटकातील कलबुर्गी आणि आंध्र प्रदेशातील आवार्काल यांचा समावेश आहे.
व्ही. के. सिंह म्हणाले २००७ साली एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्स यांचे एकत्रिकरण झाले. तेव्हापासूनच कंपनीला मोठा तोटा होत आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत कंपनीचा एकूण तोटा ७० हजार ८२० कोटी रुपये झाला आहे.
एयर इंडियाच्या लिालावासाठी बोली लावण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२१ आहे. त्यासाठी २७ जानेवारी २०२० पर्यंत निविदा भरायच्या होत्या. कोरोना महामारीमुळे ही मुदत १४ डिसेंबर २०२० करण्यात आली होती, असेही सिंह यांनी सांगितले.
The aviation industry will get a booster dose, the Modi government will invest Rs 25,000 crore for domestic air transport
महत्त्वाच्या बातम्या
- भारत-इस्रायल लष्करी संबंध मजबूत करणार, एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया यांनी केली चर्चा
- सीबीआयचे माजी संचालक अलोक वर्मांविरोधात शिस्तभंगाची कारवाई, केंद्रीय गृहविभागाने केली शिफारस
- सरकार चर्चेला तयार पण विरोधकच चर्चेसाठी तयार नाहीत, रविशंकर प्रसाद यांचा आरोप
- गौडबंगाल : आमदार निलेश लंके यांनी मारहाण केल्याची तक्रार लिपीकाने केली आणि परतही घेतली!