• Download App
    आसाम युवक काँग्रेसच्या महिला अध्यक्षाला छळणाऱ्या युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षांविरुद्ध आसाम पोलिसांची कठोर कायदेशीर कारवाई}The Assam police is acting in accordance with the law. They are currently investigating a case filed by a female Congress worker against the accused person under Section 354 of IPC.

    आसाम युवक काँग्रेसच्या महिला अध्यक्षाला छळणाऱ्या युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षांविरुद्ध आसाम पोलिसांची कठोर कायदेशीर कारवाई

    वृत्तसंस्था

    गुवाहाटी : अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास आणि पदाधिकारी वर्धन यादव यांच्या विरोधात आसाम युवक काँग्रेसच्या अध्यक्ष अंकिता दत्ता यांनी छळवणुकीचा आरोप केला. त्या आरोपांची चौकशी करण्याऐवजी काँग्रेसने अंकिता दत्ता यांचीच हकालपट्टी केली. मात्र, अंकिता दत्त यांच्या तक्रारीची दखल आसाम पोलिसांनी घेऊन बी. व्ही. श्रीनिवास यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी एक ट्विट करून आसाम पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली आहे?, याचे तपशील दिले आहेत.The Assam police is acting in accordance with the law. They are currently investigating a case filed by a female Congress worker against the accused person under Section 354 of IPC.



    बी. व्ही. श्रीनिवास यांच्या विरोधात आसाममधील दिसपूर पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंड संहिता (आईपीसी) की धारा 509, 294, 341, 352, 354, 354 ए आणि 506 गुन्हा दाखल केला आहे.

    याआधी हेमंत विश्वशर्मा यांनी बी. व्ही. श्रीनिवास आणि अंकिता दत्ता यांच्यातला वाद हा काँग्रेसचा अंतर्गत मामला आहे. तो पक्षांतर्गतच चौकशी करून त्यांनी सोडवावा, अशी सूचना केली होती. परंतु, प्रत्यक्षात काँग्रेसचा वाद पक्षांतर्गत पातळीवर सुटलाच नाही. त्याऐवजी काँग्रेसने अंकिता दत्ता यांची आसाम युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हाकालपट्टी केली. मात्र, दरम्यानच्या काळात आसाम पोलिसांनी श्रीनिवास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आणि त्या संदर्भात पुढची कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

    The Assam police is acting in accordance with the law. They are currently investigating a case filed by a female Congress worker against the accused person under Section 354 of IPC.

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे