• Download App
    अकाली दल आणि आम आदमी पार्टीचे पंजाब मध्ये नुसत्या बहुमताचे नव्हे, तर थेट लाटांचेच दावे!! The Akali Dal and the Aam Aadmi Party do not have a simple majority in Punjab

    Punjab voting : अकाली दल आणि आम आदमी पार्टीचे पंजाब मध्ये नुसत्या बहुमताचे नव्हे, तर थेट लाटांचेच दावे!!

    वृत्तसंस्था

    चंदिगड : पंजाब मध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असताना अकाली दल आणि आम आदमी पार्टीच्या बड्या नेत्यांनी नुसत्या बहुमताचा नव्हे, तर थेट आपापल्या पक्षांची लाट असल्याचाच दावा केला आहे.The Akali Dal and the Aam Aadmi Party do not have a simple majority in Punjab

    पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे चिरंजीव आणि अकाली अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी राज्यात अकाली दल आणि बहुजन समाज पक्षाच्या युतीची लाट असल्याचा दावा केला आहे. जनतेचा मतदानाला चांगला प्रतिसाद आहे. याचा अर्थ पंजाब मध्ये परिवर्तनासाठी मतदान होत आहे. अकाली दल आणि बहुजन समाज पक्षाने या मतदानाचा आघाडी घेतल्याचे रिपोर्ट आहेत, असा दावा सुखबीर सिंग बादल यांनी केला आहे.

    तर दुसरीकडे आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी देखील राज्यात आम आदमी पार्टीची लाट असल्याचा दावा केला आहे. 2022 च्या निवडणुकीत पहिल्यांदा लोक मोकळेपणाने स्वयंस्फूर्तीने मतदान करत आहेत. आम आदमी पार्टीची वाटचाल मोठ्या विजयाच्या दिशेने त्यामुळेच सुरू आहे, असे ते म्हणाले आहेत.

    अमृतसर पूर्व मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचा पराभव करण्याचा दावा अकाली दलाचे उमेदवार मनजितसिंग मजीठिया यांनी केला आहे. पंजाब मध्ये दुपारी बारा वाजेपर्यंत 23% मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आता सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या यंत्रणा कामाला लावल्याचेही दिसत आहे.

    The Akali Dal and the Aam Aadmi Party do not have a simple majority in Punjab

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य