• Download App
    सुटेबल बॉयमधील ही अभिनेत्री आहे कॉँग्रेसची लखनौमधील उमेदवार, दंगलप्रकरणी झाली होती अटकही|The actress from Suitable Boy is a Congress candidate from Lucknow who was also arrested in connection with the riots

    सुटेबल बॉयमधील ही अभिनेत्री आहे कॉँग्रेसची लखनौमधील उमेदवार, दंगलप्रकरणी झाली होती अटकही

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ : सीएएस विरोधातील आंदोलनात सक्रीय राहिलेल्यांना उमेदवारी देण्यास कॉँग्रेसने प्राधान्य दिले आहे. लखनौ सेंट्रल मतदारसंघातून सुटेबल बॉय या मालिकेतील एका अभिनेत्रीला उमेदवारी दिली आहे. नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात या अभिनेत्रीवर दंगल घडविण्याचाही आारोप आहे.The actress from Suitable Boy is a Congress candidate from Lucknow who was also arrested in connection with the riots

    सदफ जफर ही मूळची उत्तर प्रदेशातील लखनौची आहे. ती व्यवसायाने शिक्षिका आणि अभिनेत्री आहे. सदाफ जफरने चित्रपट निर्मात्या मीरा नायर यांच्या अ सुटेबल बॉय या चित्रपटात अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे. सध्या ती आपल्या दोन मुलांसह लखनौमध्ये राहते.



    नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांनी सदफला लखनौ येथून अटक केली. २००९ मध्ये तिला अटक करण्यात आली होती. दंगल आणि हत्येप्रकरणी अटक झाल्यानंतर सदफ जफर सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहे.

    प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांची मुलगी उरुषा इम्रान राणा हिलाही कॉँग्रेसने पुरवा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मुनव्वर राणा यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर काही दिवसांपूर्वी टीका केली होती. ‘माफिया’ असा उल्लेख करतानाच योगी पुन्हा सत्तेत आल्यास आपण लखनऊ आणि उत्तर प्रदेश सोडून दुसरीकडे जाणार, अशी घोषणाच मुनव्वर राणा यांनी केली आहे.

    या पार्श्वभूमीवर राणा यांची कन्या उरुषा म्हणाली, मुनव्वर राणा हे माझे वडील असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यांनी एखादे विधान केले असेल तर त्यामागे काहीतरी ठोस कारण निश्चित आहे. राजकारणाशी त्यांचा जराही संबंध नसून जे वाटलं त्याबाबत ते परखडपणे बोलले आहेत. १० मार्चला माझ्या वडिलांना लखनऊ सोडावं लागणार नाही तर मुख्यमंत्री योगींनाच लखनऊ सोडून परत गोरखपूरला जावं लागणार आहे.

    The actress from Suitable Boy is a Congress candidate from Lucknow who was also arrested in connection with the riots

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य