विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद – बलुचिस्तानच्या सिबी जिल्ह्यात गस्त घालणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात पाच सैनिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान सशस्त्र दलांच्या प्रसिद्धी खात्याने या चकमकीत दहशतवाद्यांची मोठी जिवीत हानी झाल्याचा दावा केला, पण किती जण मारले गेले याचा तपशील दिला नाही. Terrorist attack on pak army in Baluchistan
पाकिस्तानचे गृह मंत्री शेख रशीद अहमद यांनी या हल्ल्याचा निषेध केला, तर विरोधी पक्षनेते शाहबाझ शरीफ यांनी बलुचिस्तानामधील वाढत्या सामाजिक उद्रेकाबाबत चिंता व्यक्त केली. तेथील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारावी म्हणून तातडीने प्रयत्न होण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
दहशतवाद्यांच्या शस्त्रास्त्र व इतर सामग्रीचेही मोठे नुकसान झाल्याचेही सांगण्यात आले. दहशतवाद्यांना पळून जाता येऊ नये म्हणून त्या विभागात शोधमोहिम सुरु करण्यात आली.
Terrorist attack on pak army in Baluchistan
महत्त्वाच्या बातम्या