विशेष प्रतिनिधी
हैद्राबाद :राज्यात प्रचंड बहुमताने निवडून आल्यावर पोटनिडणुकीत पराजय पत्करावा लागल्यावर तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव बिथरले आहेत. भाजपच्या नेत्यांना जिभच कापून टाकू अशी धमकी दिली आहे.Telangana Chief Minister threatens BJP leaders to cut out their tongues
राव यांनी म्हंटले आहे की, केंद्राकडून सांगितलं जातंय की धान्य खरेदी केली जाणार नाही. मात्र, राज्यातील भाजप प्रमुख शेतकऱ्यांना धान्य खरेदीचं आश्वासन देत आहेत. ‘राज्य सरकारबद्दल गैरजरुरी आणि बेजबाबदार वक्तव्य केलीत तर जीभ कापून टाकू. ‘केंद्रानं धान्य खरेदी करणार नसल्याचं सांगितलंय.
याच कारणामुळे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी तोटा टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी इतर पिकं घेण्याचा सल्ला दिलाय. राज्यानं खरेदी केलेले तांदूळ घेण्यासाठी मी थेट केंद्रीय मंत्र्यांना जाऊन भेटलो होतो. तेव्हा त्यांनी लवकरच याबद्दल निर्णय घेऊन सूचना देऊ असं म्हटलं होतं. मात्र, आतापर्यंत त्यांच्याकडून कोणतंही उत्तर मिळालेलं नाही.
तेलंगणा राज्याकडे अगोदरपासूनच गेल्या वर्षीचं जवळपास पाच लाख टन धान्य पडून आहे. परंतु, हे धान्य खरेदी करण्याची केंद्राची तयारी नाही. केंद्राचा हा व्यवहार अतिशय बेजबाबदार आहे.बांडी संजय म्हणतात की ते मला तुरुंगात धाडणार आहेत. मी त्यांना आव्हान देतो की त्यांनी मला हात लावून दाखवावाच असा इशाराही राव यांनी दिला आहे.
Telangana Chief Minister threatens BJP leaders to cut out their tongues
महत्त्वाच्या बातम्या
-
- ब्रिटनमध्ये प्रथमच महात्मा गांधीजींचे चित्र असलेले नाणे प्रसिद्ध
- प. बंगालमध्ये इंधनावरील व्हॅट कमी करण्याची भाजपची तृणमूल काँग्रेसकडे मागणी
- रशियाचे तब्बल ९० हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर, तणाव वाढला
- अमिताभ बच्चन यांच्या घरातील पेंटिंगची चर्चा
- भारताची भूमी बळकाविण्यासाठी चीनच्या सातत्याने व्यूहात्मक खेळी – अमेरिकेचा अहवाल