• Download App
    मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करणाºया सुल्ली अ‍ॅपवर कारवाई करा, कॉँग्रेसचे खासदार मो. जावेद यांनी केली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती|Take action on Sulli app for uploading photos of Muslim women, Congress MP Mohd. Javed made the request to Union Home Minister Amit Shah

    मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करणाऱ्या सुल्ली अ‍ॅपवर कारवाई करा, कॉँग्रेसचे खासदार मो. जावेद यांनी केली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मुस्लिम महिलांचे फोटो अ‍ॅपवर अपलोड करून लिलाव केल्याप्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई करावी अशी विनंती कॉँग्रेसचे खासदार मो. जावेद यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. सर्वपक्षीय ५६ खासदारांनी केलेल्या सह्यांचे निवेदन जावेद यांनी दिले आहे.Take action on Sulli app for uploading photos of Muslim women, Congress MP Mohd. Javed made the request to Union Home Minister Amit Shah

    याबाबत केलेल्या ट्विटमध्ये मो. जावेद यांनी म्हटले आहे की, माननीय गृहमंत्री जी यांना निवेदन देऊन विनंती केली आहे की सुली डिल्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या अ‍ॅपवर कारवाई करावी. यामागे असलेल्या गुन्हेगारांची चौकशी करून दोषींना तातडीने अटक करावी. मुस्लिम महिलांच्या समर्थनार्थ या पत्रावर स्वाक्षरी केल्याबद्दल सर्वपक्षीय ५६ खासदारांचा मी आभारी आहे.



    सुल्ली डिल्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या अ‍ॅपवर मुस्लीम तरुणींचे फोटो अपलोड करून त्यांचा लिलाव करण्यात येत असल्याचे प्रकरण समोर आले होते. या अ‍ॅपच्या माध्यमातून 80 हून अधिक महिलांची बोली लावण्यात आली होती. काही पीडित तरुणींनी यासंदर्भात दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली, यानंतर सायबर सेलने एफआयआर दाखल केली होती.

    सुल्ली डिल्स या शब्दाचा वापर ा वापर काही लोक मुस्लीम महिलांसाठी करतात. कुठलीही परवानगी न घेता अपलोड करण्यात आले होते. महिलांचे फोटो सुल्ली फॉर सेल नावाने एक ओपन सोर्स अ‍ॅप तयार करण्यात आले. यात महिलांच्या ट्विटर हँडलवरून माहिती आणि पर्सनल फोटोज चोरी करून टाकण्यात आले. यानंतर यांचा सार्वजनिकरित्या लिलाव करण्यात आला

    या अ‍ॅपने त्यांच्या सोशल मीडिया वेबसाइटवरून पत्रकारांसह अनेक महिलांची छायाचित्रे पोस्ट केली होती. महिलांचा असा आरोप आहे की त्यांची चित्रे संमतीशिवाय वापरल्या गेल्यानंतर त्यांना धमक्या देण्यात आल्या.

    Take action on Sulli app for uploading photos of Muslim women, Congress MP Mohd. Javed made the request to Union Home Minister Amit Shah

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य