विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – सोशल मीडियाद्वारे न्यायालयाबाहेर समांतर न्यायालय चालवू नका,’’ असे सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना आज सुनावले.
माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, वरिष्ठ पत्रकार एन. राम आणि शशिकुमार, सीपीएमचे राज्यसभा खासदार जॉन ब्रिटस आणि वकील एमएल शर्मा यांनी याचिका दाखल केल्या आहेत. याचिकाकर्त्यांच्यावतीने कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत. Supreme court targets on petionar for pegasis case
‘पेगॅसस’ या स्पायवेअरद्वारे भारतातील ३००हून अधिक जणांची हेरगिरी करण्यात आल्याचा केला जात आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. सुनावणीच्यावेळी न्या. रमणा म्हणाले, ‘‘याचिकाकर्ते माध्यमांसमोर या प्रकरणी वक्तव्ये करत आहेत. सर्व युक्तिवाद न्यायालयात व्हायला हवेत. जर याचिकाकर्त्यांना सोशल मीडियावर वादविवाद करायचे असतील तर, ते त्यांच्यावर अवलंबून आहे. पण जर ते न्यायालयात आले असतील तर त्यांनी न्यायालयात युक्तिवाद करावा. त्यांचा न्यायालयावर विश्वास असावा.’’
कपिल सिब्बल यांनीही न्यायालयाच्या मताशी सहमती दर्शविली. एखादे प्रकरण न्याय प्रविष्ट असेल तर, न्यायालयाबाहेर टिपणी करण्यात येऊ नये, असे ते म्हणाले.
Supreme court targets on petionar for pegasis case
महत्त्वाच्या बातम्या
- सैफ-करीना तिसऱ्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवणार, मुघलांची आयपीएल टीम तयार करत आहेत, नेटकऱ्यां चा दुसऱ्या मुलाच्या नावावरून निशाणा
- राज्यसभेतील दांडीबहाद्दर भाजपा खासदारांची पंतप्रधान घेणार झाडाझडती
- पेगासिस प्रकरणी याचिका दाखल करणाऱ्यांना न्यायालयाने फटकारले, वादविवाद केवळ न्यायालयातच व्हायला हवा, सोशल मीडियावर नाही
- पश्चिम बंगालमधील धक्कादायक घटना, भाजपा कार्यकर्त्याच्य ३४ वर्षीय पत्नीवर घरात घुसून सहा जणांकडून सामूहिक बलात्कार, तृणकूल कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे कृत्य
- प्रीतम मुंडे, नवनीत राणांनी शिवसेनेला लोकसभेत धू धू धूतले, मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर तुमचा कळवळा कोठे गेला होता?