Supreme Court : ग्रीन क्रॅकर्सच्या नावावर जुने फटाके विकण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. न्यायालयाने सर्व राज्यांना इशारा देताना म्हटले की, फटाक्यांवर बंदी घालण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचे पालन सर्व राज्यांमध्ये व्हावे. कोर्टाने म्हटले की, फटाक्यांच्या माळांवर बंदी घालण्यात आली आहे, परंतु, त्यांचा वापर सर्व सणांमध्ये होत आहे. Supreme Court reprimanded firecracker companies for selling old crackers in name of green crackers
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ग्रीन क्रॅकर्सच्या नावावर जुने फटाके विकण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. न्यायालयाने सर्व राज्यांना इशारा देताना म्हटले की, फटाक्यांवर बंदी घालण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचे पालन सर्व राज्यांमध्ये व्हावे. कोर्टाने म्हटले की, फटाक्यांच्या माळांवर बंदी घालण्यात आली आहे, परंतु, त्यांचा वापर सर्व सणांमध्ये होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, आम्ही प्राणांचे मोल देऊन सण साजरा करण्यास परवानगी देऊ शकत नाही, सणादरम्यान लोकांना एवढे फटाके कोठून मिळतात? सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, फुलझडी किंवा इतर आवाज न करणारे फटाके वापरूनही सण साजरा केला जाऊ शकतो. कर्णकर्कश्श फटाक्यांना परवानगी नाही. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने फटाका कंपन्यांना फटकारले
न्यायालयाच्या आदेशानंतरही फटाक्यांमध्ये बंदी घालण्यात आलेल्या साहित्याचा वापर केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने फटाका निर्मिती कंपन्यांना फटकारले. सर्वोच्च न्यायालयाने फटाके निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना सांगितले की, आम्ही तुम्हाला बंदी घातलेल्या वस्तू गोदामातही ठेवण्याची परवानगी देणार नाही.
यापूर्वी, मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाचा आदेश असूनही बंदी घातलेल्या साहित्याचा वापर करणाऱ्या 6 फटाका कंपन्यांना नोटिसा बजावल्या होत्या. सीबीआयच्या प्राथमिक तपासात या कंपन्यांकडून बेरियम खरेदी करणे आणि त्यांचा फटाक्यांमध्ये वापर करणे ही बाब समोर आली आहे. कंपन्यांचे परवाने रद्द करण्याचा विचार करू, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.
Supreme Court reprimanded firecracker companies for selling old crackers in name of green crackers
महत्त्वाच्या बातम्या
- वार – पलटवार : राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपकडूनही टीकास्त्र, पात्रा म्हणाले, ‘गांधी कुटुंबाकडून लखीमपूर खीरी शोकांतिकेचा वापर बुडणारे जहाज वाचवण्यासाठी!’
- केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय, ७ मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्यास मंजुरी, लाखो लोकांना रोजगारही मिळणार
- देशात पहिल्यांदाच बलात्कार प्रकरणाच्या खटल्यात पाचव्या दिवशी शिक्षा, नराधमाला 20 वर्षांचा तुरुंगवास आणि 2 लाखांचा दंड
- Jioचे नेटवर्क डाऊन : सकाळी 9.30 पासून Jioच्या नेटवर्कमध्ये समस्या, कॉल आणि इंटरनेट वापरकर्ते त्रस्त
- तालिबानी नेता अनस हक्कानीची महमूद गझनवीच्या कबरीला भेट, सोमनाथ मंदिर विध्वंसाचा केला उल्लेख