• Download App
    फालतू याचिका, तुम्ही मंगळवार राहता का म्हणत सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली कॉँग्रेस नेत्याची निवडणुका पुढे ढकलण्याची याचिका|Supreme Court rejects Congress leader's plea to postpone polls

    फालतू याचिका.. तुम्ही मंगळावर राहता का..? सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली कॉंग्रेस नेत्याची निवडणुका पुढे ढकलण्याची याचिका!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेस नेत्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. याचिकाकत्यार्ने कोविड-१९च्या ओमायक्रॉन विषाणूचा प्रकार वेगाने होत आहे म्हणत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती.Supreme Court rejects Congress leader’s plea to postpone polls

    उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते जगदीश शर्मा यांची याचिका फेटाळून लावत याचिकाकर्ते मंगळावर राहत आहे का असा सवाल केला. याचिकेवर नाराजी व्यक्त करताना न्यायमूर्ती विपिन सांघी आणि जसमीत सिंग यांच्या खंडपीठाने सांगितले की, ही एक फालतू याचिका आहे.



    तुम्ही मंगळावर राहत आहात का? दिल्लीत आता रुग्णांची कमी होताना दिसत आहेत. तुम्ही ती मागे घ्या नाहीतर आम्ही फेटाळून लावू. त्यानंतर याचिकाकर्त्याच्या वकिलांनी याचिका मागे घेतली.ऑक्सिजनची उपलब्धता आणि वितरणासाठी योजना सादर करण्याचे निर्देश सरकारांना द्यावेत

    आणि पाचही राज्यांतील निवडणुका काही आठवडे किंवा महिन्यांनी पुढे ढकलण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी विनंती काँग्रेस नेते जगदीश शर्मा न्यायालयाला केली होती. उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरमधील विधानसभा निवडणुका १० फेब्रुवारीपासून सुरू होत असून ७ मार्चला संपणार आहेत. १० मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

    Supreme Court rejects Congress leader’s plea to postpone polls

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Foreign Universities : 15 परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस उघडण्याची मंजुरी; ऑगस्टपासून पहिली बॅच; परदेशी पदवी मिळेल, शिक्षणाचा खर्च होईल 30-40% कमी

    Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी जंतर-मंतरवर उपोषणाला सुरुवात केली; NEET पेपरफुटीवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

    Prashant Kumar Dutta : आसामच्या माजी डीआयजींची 53 कोटी रुपयांची संपत्ती जप्त; 7.23 कोटी उत्पन्नाच्या तुलनेत 79 कोटींची संपत्ती