• Download App
    सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याचा सरन्यायाधीशांचा प्रस्ताव Supreme court proceeding telicast live in future

    सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याचा सरन्यायाधीशांचा प्रस्ताव

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीरपणे विचार करीत असल्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी सांगितले. Supreme court proceeding telicast live in future

    सर्वोच्च न्यायालयातील व्हर्च्युअल कामकाज प्रसारमाध्यमांना उपलब्ध करून देणाऱ्या ॲप्लिकेशनचे उद्घा्टनाप्रसंगी सरन्यायाधीश बोलत होते. नव्याने विकसित झालेले हे तंत्रज्ञान संवेदनशील असून वापर करताना सुरुवातीच्या काळात काही समस्या उद्भजवण्याची शक्यता असून त्याला विनाकारण मोठे स्वरूप देऊ नये.



    हे तंत्रज्ञान कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरळीत चालण्यासाठी तांत्रिक पथकाला पाठिंबा व प्रोत्साहन द्यावे,’’ अशी विनंती सरन्यायाधीश रमणा यांनी केली. महत्त्वाच्या निकालाची थोडक्यात आणि सोप्या भाषेतील माहिती यात देण्यात येणार आहे.

    हे वैशिष्ट पत्रकारांसाठी अत्यंत महत्त्वाचा स्रोत ठरणार आहे आणि याद्वारे सामान्य नागरिकांना न्यायालयाच्या निकालांबाबत योग्य माहिती मिळू शकेल,’’ असा विश्वाास त्यांनी व्यक्त केला. वार्तांकन करताना पत्रकारांना मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. न्यायालयीन कामकाजाचे वार्तांकन करताना पत्रकारांना वकिलांवर अवलंबून राहावे लागत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सुनावणीला पत्रकारांना उपस्थित राहता यावे, अशी व्यवस्था करण्याची विनंती करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.

    Supreme court proceeding telicast live in future

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Raghuram Rajan : रघुराम राजन म्हणाले- रशियन तेल खरेदीबाबत पुन्हा विचार व्हावा; याचा फायदा कोणाला?

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो