विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : युनिटेकचे माजी संचालक संजय चंद्रा आणि अजय चंद्रा तिहार कारागृहातून भूमिगत कार्यालयाद्वारे आपला व्यवसाय चालवित असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर चंद्रा यांना तिहार जेलमधून मुंबईच्या आर्थर रोड जेल आणि तळोजा मध्यवर्ती कारागृहात स्थानांतरित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या बेकायदेशिर कृत्यांसाठी कारागृह अधिकाऱ्यांचेही संगनमत होते असे उघडकीस आले आहे.Supreme Court orders move of Sanjay and Ajay Chandra from Tihar Jail to Arthur Road and Taloja Jail, were running office from Tihar Jail
संजय आणि अजय चंद्रा तिहार जेलमधून कथितरित्या ज्याप्रकारे काम करत आहेत त्याबद्दल नाराजी व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिस आयुक्तांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आणि चार आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
युनिटेकचे संस्थापक रमेश चंद्रा अंडरग्राऊंड ऑफिसचा वापर करत होते आणि पॅरोल किंवा जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांचे पुत्र संजय चंद्रा आणि अजय चंद्रा यांनी त्या ऑफिसला भेट दिली होती, अशी माहिती सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सर्वोच्च न्यायालयाला दिली होती.
ईडीकडून चंद्रा आणि युनिटेक लिमिटेडच्या विरोधात मनी लाँडरिंगच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. तसेच संजय आणि अजय चंद्रा दोघंही न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, तरीही ते तुरुंगाच्या आत राहून त्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत तसेच मालमत्ता विकत आहेत, असे ईडीने म्हटले होते.
न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि एम आर शाह यांच्या खंडपीठापुढे अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने बाजू मांडताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल माधवी दिवाण यांनी सांगितले की चंद्रांनी त्यांच्याबद्दलची माहिती बाहेरच्या जगाला देण्यासाठी कारागृहाबाहेर अधिकारी नेमले आहेत. तपासात आम्ही एक गुप्त भूमिगत कार्यालय शोधून काढले आहे, ज्याचा वापर रमेश चंद्रा करत आहेत.
त्यांची मुले पॅरोल किंवा जामिनावर असताना त्या ऑफिसला भेट देतात. आम्ही त्या कार्यालयातून शेकडो मूळ विक्री कागदपत्रे, शेकडो डिजिटल स्वाक्षºया आणि देश आणि विदेशातील मालमत्तेसंदर्भात संवेदनशील डेटा असलेले अनेक संगणक जप्त केले आहेत.
ईडीने सीलबंद कव्हरमध्ये दोन अहवाल कोर्टात सादर केले असून त्यासोबत युनिटेक लिमिटेडच्या देश-विदेशातील ६०० कोटींच्या मालमत्तेसंदभार्तील माहिती जोडली आहे. माधवी दिवाण यांनी सांगितले की ईडीला शेल कंपन्यांच्या माध्यमातून तयार केलेली मनी ट्रेलची एक साखळी सापडली आहे.
त्याच्या माध्यमातून त्यांची संपत्ती ते रिअल टाईममध्ये विकत आहेत, त्यामुळे तपासात अडचणी येत आहेत चंद्रा जेलमध्ये राहून त्यांचं काम करत आहेत. न्यायालयीन कोठडीत असूनही ते बाहेरच्या लोकांशी संवाद साधत आहेत आणि कारागृहाच्या बाहेर नियुक्त केलेल्या लोकांच्या मदतीने सूचना देत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट २०१७ पासून तुरुंगात असलेल्या चंद्राचा भाऊ अजय चंद्राचा जामीन अर्जही फेटाळला होता. संजय आणि अजय या दोघांवर घर खरेदीदारांचे पैसे लुबाडल्याचा आरोप आहे. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०१७ च्या आदेशात त्यांना ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये ७५० कोटी रुपये जमा करण्यास सांगितले होते. तर, न्यायालयाच्या अटींचे पालन करून ७५० कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा केल्याने नियमित जामीन दिला जातो, असा दावा चंद्रांनी केला आहे.
Supreme Court orders move of Sanjay and Ajay Chandra from Tihar Jail to Arthur Road and Taloja Jail, were running office from Tihar Jail
महत्त्वाच्या बातम्या
- अखेर महाविकास आघाडी सरकारने अनिल देशमुखांच्या डोक्यावरील हात काढला, रश्मी शुक्ला यांनी बनविलेला अहवाल सीबीआयलो देण्याची तयारी
- विश्व हिंदू सेनेच्या अध्यक्षाचे तालीबानी बोल, नारायण राणे यांचा शिरच्छेद करणाऱ्यास ५१ लाख रुपयांच्या बक्षीसाची घोषणा
- अनुराधा पौडवाल भाजपाच्या वाटेवर, उत्तराखंड निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांना बांधली राखी
- केंद्रीय मंत्री पशुपतीकुमार पारस यांना जीवे मारण्याची धमकी, अमित शहा आणि नितीशकुमार यांना पत्र लिहून केली सुरक्षा वाढविण्याची मागणी