वृत्तसंस्था
नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत (नीट-पीजी) ओबीसींना २७ % आणि आर्थिकदृष्टया मागास घटकाला १० % आरक्षण लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने आज दिला आहे. नीट-पीजी २०२१ काऊंसलिंग आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी आणि ओबीसींसाठी या सत्रासाठी ओबीसी आरक्षण आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठीचा कोटा कायम राहणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. Supreme Court approves OBC, financially backward reservation in medical “neat” medical entrance exam
या सत्रापासून आरक्षण लागू होईल, असे सुप्रीम कोर्टाने मान्य केले आहे. आता न्यायालयाच्या निर्णयानंतर काऊंसलिंग मार्ग मोकळा झाला आहे. आजच्या सुनावणी दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या सत्रात ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी कोट्यासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे या सत्रासाठी सरकारच्या २७% ओबीसी आरक्षणाच्या योजनेला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर आता ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अखिल भारतीय कोट्याच्या २७ % जागांवर आरक्षण मिळणार आहे. येत्या सत्रासाठी मार्च महिन्यात कोट्यातील जागांवर आरक्षणाबाबत सुनावणी होईल, असेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारने यावर्षी वैद्यकीय प्रवेशात अखिल भारतीय कोट्यातील जागांवर २७% ओबीसी आरक्षण आणि १० % आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाचे आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी नीट २०२१ च्या काऊंसलिंगमधूनच होणार असल्याचे सांगण्यात आले, त्याला विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. नीट २०२१ पासून नवीन नियम लागू करू नये, अशी त्यांची मागणी आहे. त्याचवेळी वैद्यकीय काऊंसलिंग समितीने काऊंसलिंगच्या तारखा जाहीर केल्यावर विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अनेकवेळा झालेल्या सुनावणीतही अंतिम निर्णय झाला नव्हता. मात्र आता सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर या सत्रात ओबीसी तसेच खुल्या गटातील विद्यार्थ्यांना अनुक्रमे 27% आणि 10 % आरक्षण लागू राहणार आहे.
Supreme Court approves OBC, financially backward reservation in medical “neat” medical entrance exam
महत्त्वाच्या बातम्या
- NEET PG Counselling : ओबीसी EWS विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा;पीजी आरक्षणावर महत्त्वाचा निर्णय
- कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी चिंता करण्याची गरज नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया
- पंतप्रधानांच्या सुरक्षेत नेमकी त्रुटी कुठे? माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षितांनी सांगितले…